Shocking video: कधी, कुठे, कसं, काय दुर्घटना घडेल आपण सांगू शकत नाही. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. टायरमध्ये हवा भरताना इतकी भयंकर दुर्घटना घडली आहे. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरेल. गाड्यांना किंवा पेट्रोलपंपवर आग लागल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना जितका धोका तितकाच टायरमध्ये हवा भरतानाही असू शकतो. हेच या व्हिडीतून दिसून येतं. त्यामुळे टायरमध्ये हवा भरतानाही काळजी घ्यायला हवी, थोडं जपूनच राहायला हवं.
राजस्थानच्या अजमेरमध्ये बस चालकाच्या मृत्यूची धक्कादायक दृश्ये दाखवणारा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरुन समोर आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी किशनगड परिसरात घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बस चालक वाहनाच्या टायरमध्ये हवा भरत होता आणि त्यातील एक टायर फुटला, ज्यामुळे हा अपघात झाला. बस चालक टायरमध्ये हवा भरण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. काही सेकंदातच एक टायर फुटून माणूस हवेत उंच उडतो आणि परत जमिनीवर पडतो. स्फोटानंतर तो हलताना दिसत नाही, त्यामुळे भीषण स्फोटाच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे या व्हिडीओतूनही स्पष्ट होतं आहे. या भयानक स्फोटानंतर जागीच त्या व्यक्तीचा जीव गेल्याचं बोलंल जात आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> इतकी शायनिंग मारायचीच कशाला? पडला ना तोंडावर…अपघाताचा धक्कादायक VIDEO व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, टायरमध्ये हवा भरत असताना स्फोट झाला, त्यामुळे बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. किशनगडजवळील रुपनगड परिसरात परबतसर मार्गावरील गुजराती हॉटेलजवळ हा अपघात झाला. बोडुराम जाट असे मृताचे नाव असून तो लोसल सीकर येथील रहिवासी आहे. टायरचा ब्लास्ट होण्याच्या अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.
दरम्यान टायरची काळजी कशी घ्यायची ते पाहुयात.
- प्रत्येक गोष्टीचे वय असतं असं म्हणतात. तशाच प्रकारे टायरला देखील आहे. जसजसा वेळ जातो तसतसा टायर जड होतो. त्यामुळे टायरची लवचिकता आणि पकड प्रभावित होते. टायरचं आयुष्य तीन वर्ष किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खेरदी करू नका.
- टायरच्या रबरच्या कडकपणामुळे किंवा ट्रेडवर क्रॅकच्या खुणा असल्यामुळे टायरमध्ये घट देखील होते. गाडी कमी चालवल्यामुळे अनेकदा असं घडतं. या प्रकाराच्या टायरमुळे तुम्ही कमी वेगानं प्रवास करू शकतात. पण जर हायवेवर गाडी चालवायची असल्यास किंवा तुम्हाला वेगानं गाडी चालवायची आवड असल्यास टायर बदलणं गरजेच आहे.
- कार ड्रायव्हिंग करण्याच्या पद्धतीनुसार कारचे मागचे किंवा पुढचे टायर्स कमी किंवा अधिक प्रमाणात घासले जातात. अशा वेळी टायर्सची अदलाबदली करायला हवी. जेणे करून सर्व टायर्स सम प्रमाणात घासले जातील आणि त्यांची साईज सारखीच राहील.