Rajsthan video: शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणांना देखील मोबाईल गेमचे वेड लागले आहे. सध्या लहान मुलांसह मोठी माणसे व्हिडिओ गेम खेळताना दिसतात. सध्या तेच करमणुकीचे साधन झाले आहे. मोबाईल आणि ऑनलाईन गेमचं व्यसन असं भिनतं की त्यासाठी वाटेल ते करायला मुलं तयार होतात. आपली तहान आणि भूक विसरून गेममध्ये मशगूल असणारी मुलं तर आपण पाहतोच.पण आता मुलं झोपदेखील विसरत असल्याचं दिसतं. रात्र-रात्रभर जागून मोबाईल गेम खेळत असतात. सध्या असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गेम खेळून एका मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमध्ये एक मुलगा ऑनलाईन गेम्सच्या इतका आहारी गेला आहे की यामध्ये त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तो थरथरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्पेशल टीचर भवानी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार तो फ्री फायर सारख्या खेळाच्या आहारी गेला होता. यामध्ये मुलांना अपयश जिव्हारी लागतं. अनेकजण यामध्ये एकतर आत्महत्या करतात किंवा मानसिक संतुलन गमवतात. दरम्यान आता यामध्ये थेरपी म्हणू अशा काही स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीज प्लॅन केल्या आहेत ज्याद्वारा त्याला त्या जिंंकून पुन्हा आत्मविश्वास दिला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न फसला; कारचा चक्काचूर, Video पाहून उडेल थरकाप

स्टडीनुसार, गेमर्स आठवड्याला सरासरी ४.६ रात्री गेम खेळतात. त्यांपैकी ३६ टक्के रात्री ते झोपायला मुद्दामहून उशिर करतात. देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan child in alwar who is suffering from severe tremors after being addicted to online gaming srk