Rajasthani Women Speaking English Instagram video: भाषा हे संवाद साधण्याचे फक्त माध्यम आहे. भारत देश जिथे विविध भाषा बोलल्या जातात पण इथे इंग्रजी भाषेत बोलणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. इतर भाषांना महत्त्व नाही असे नाही पण इंग्रजी भाषा बोलणे सर्वांसाठी सोपे नसते. अनेक जण शाळेमध्ये शिकूनही व्यवस्थित इंग्रजी भाषा बोलू शकत नाही. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी कित्येकजण क्लासेस लावतात पण राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहणारी एक महिला फाडफाड इंग्रजी बोलते तेही कोणत्याही शाळेत न शिकता किंवा अभ्यास न करता. एका परदेशी नागरिकासह इंग्रजीमध्ये संवाद साधणाऱ्या या आदिवासी महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
युट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक राजस्थानी महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजस्थानच्या प्रसिद्ध पुष्करच्या जत्रेमध्ये एका गावात राहणारी महिला इंग्रजीमध्ये बोलताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर jitendra_kalbeliya नावाच्या अकाउंटवर तर युट्युबवर@ravisharma-zs9oj नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला महिला आपले नाव सांगते आणि इंग्रजीमध्ये नमस्ते करताना विचारते की, “हाऊ आर यू?” (तुम्ही कसे आहात?) त्यावर परदेशी व्यक्ती म्हणतो, “नमस्ते, हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम?”( तुम्ही कशा आहात, तुमचे नाव काय?) त्यावर महिला उत्तर देते, “आय एम फाइन, माय नेम इज सुनिता” ( मी ठिक आहे. माझे नाव आहे सुनिता) त्यानंतर परदेशी व्यक्ती सांगतो, आय एम योहान, अँड यू लिव्ह हिअर? (मी योहान आहे. तुम्ही येथे राहता का?) त्यावर उत्तर देत महिला सांगते, “आय लिव्ह इन डेजर्ट, इन प्लास्टिक टेंट, आय हॅव्ह नो हाऊस.” (मी येथे वाळवंटात राहते, एका प्लास्टिकच्या तंबूमध्ये, माझ्याकडे घर नाही)
हेही वाचा – ‘खलासी’ गाण्यावर तरुणीने केला जबरदस्त बेली डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी झाले फॅन
त्यानंतर परदेशी नागरिक म्हणतो, “यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश”(तू खूप चांगले इंग्रजी बोलतेस) महिला सांगते की, “ती कधीही शाळेत गेली नाही आणि ना कधीही शिक्षण घेतले. तिला लिहिता वाचता येत नाही. फक्त सराव करून ती चांगली इंग्रजी बोलते आहे.” परदेशी व्यक्ती स्वतःबद्दल सांगतो की,”तो हॉलंडहून आला आहे.” यावर ती महिला सांगते, “हा देश कुठे आहे हे मला माहीत नाही,” पण शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘हॉलंड खूप दूर आहे’ आणि आमच्याकडे जाण्यासाठी पासपोर्टही नाही. इतके पैसे नाही.”
हेही वाचा – ‘दिलदार बॉस’ने दिला हटके दिवाळी बोनस! फार्मा कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना भेट दिल्या नव्या कोऱ्या १२ कार
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेचे खूप कौतुक होत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘तुम्ही भारत देशाला काय समजता?’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘तुम्ही इतक्या वर्षांत इतके इंग्रजी शिकू शकले नाही.’ दुसऱ्याने लिहिले, “मला या कालबेलिया समाजाचा अभिमान आहे. कष्ट करून कमावणाऱ्या आणि खाणाऱ्यांनी सरकारकडे कधीच काही मागितले नाही.”