आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम हा एकच मार्ग आहे. अनेक जण परिस्थितीमुळे त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. पण, काही जण याला अपवाद असतात. जे कठीण प्रसंगातूनसुद्धा त्यांच्या यशाचा मार्ग शोधून काढतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि स्वतःला बांधकाम कामगारापासून सरकारी शिक्षक बनवले आहे.

राजस्थानचे रहिवासी किशन मीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी बांधकाम कामगारापासून ते त्यांच्या सरकारी शिक्षकाच्या पोस्टवर जाण्यापर्यंतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. सुरुवातीला किशन हे इमारतीचे बांधकाम करणारे मजूर होते. फोटोमध्ये ते डोक्यावर अवजड सामान घेऊन जात आहेत. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केलं आहे आणि त्याचवेळी सरकारी शिक्षक पदाची नोकरी मिळवण्यासाठी अभ्याससुद्धा केला. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Techer Make student cutout
शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a young guy fell on terrace while dancing
डान्स करता करता तरुण थेट जिन्यावरून खाली पडला, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
College Students Clash Lonavala, Students Clash Bus Stand Lonavala, Lonavala,
VIDEO : लोणावळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
an old lady show art on camp road in pune
Pune Video : पुण्यातील कॅम्प रोडवर कला सादर करतात आजीबाई! व्हिडीओ होतोय व्हायरल
teacher used to send obscene messages Hamirpur shocking video
“न्यूड फोटो पाठवं…” विद्यार्थीनींना पाठवायचा अश्लील मेसेज; पालकांना समजताच शिक्षकाला भर शाळेत बेदम मारहाण, video व्हायरल

हेही वाचा…अनोखं टॅलेंट! २० किलो पार्ले-जी बिस्किटांपासून साकारलं अयोध्येतील श्री राम मंदिर; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना ते वेळात वेळ काढून अभ्यास करायचे. अभ्यास करून त्यांनी ‘राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षादेखील उत्तीर्ण केली. याचा पुरावा म्हणून त्यांनी फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्यानंतर अखेर किशन यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांना उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kishan.meena98_official’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी या व्हिडीओला “ना संघर्ष, ना तकलीफ तो ख़ाक मज़ा है जीने में, बड़े–बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में” अशी हिंदी भाषेत कविता लिहून त्यांच्या प्रवासाला खास कॅप्शनसुद्धा दिली आहे; जे सोशल मीडियावर अनेकांची प्रेरणा ठरत आहे.

Story img Loader