कोणाच्या नशीबात कधी काय होईल काही सांगता येत नाही. आयुष्यात सुख-दुख, अडचणी -संकटे येतात पण अशावेळी आपल्याला प्रिय व्यक्तीची साथ मिळाली तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणे सोपे होते पण दैवाने जोडीदाराच हिरावून घेतला तर आयुष्य जगणे कठीण होते. असेच काहीसे राजस्थानमधील एका व्यक्तीबरोबर घडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नको ते चॅलेंज घेणे पडले महागात! बर्फात उकळते पाणी टाकायला गेली अन्….; थरारक घटनेचा Video Viral

हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राजस्थानच्या कोटा येथे सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या आजारी पत्नीच्या सेवा करण्यासाठी लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली पण निरोप समारंभादरम्यानच जेव्हा पत्नीचे निधन झाले आणि शोककळा पसरली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल फुटेजमध्ये देवेंद्र चंदन आणि त्यांच्या पत्नीला हार घालण्यात आले दिसते कारण सहकारी त्यांचे कौतुक करत आहेत. निरोप समारंभ कार्यक्रमादरम्यान, चंदनच्या पत्नीला चक्कर येऊ लागते़. पत्नीसाठी चंदन पाणई मागवतो आणि पत्नीच्या पाठीला हळूवारपणे मालिश करतो परंतु काही क्षणांनंतर ती टेबलावर कोसळते आणि तिथेच प्राण सोडते.

हेही वाचा – उड्डाणपुलावर ई-रिक्षाचालकाची स्टंटबाजी! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “भारतात सापडला फ्लाइंग सुपरमॅन”

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. व्हिडिओ शेअर करताना एका X वापरकर्त्याने लिहिले की, “ही प्रेम आणि त्यागाची हृदयस्पर्शी कथा आहे.”

ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी शोक व्यक्त केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “पाहायला खूप हृदयद्रावक आहे. “खरे जोडपे. एकमेकांसाठी बनवलेले,” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan man takes early retirement to take care of ailing wife she dies at his farewell snk