राजस्थानच्या धौलपूरमधील एक विचित्र घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकरासाठी मोबाईल टॉवरवर चढली होती. शिवाय यावेळी चक्क ती त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट करू लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेला खाली उतरवलं, ही महिला जवळपास साडेतीन तास टॉवरवर होती.
धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे लग्न झाले असून तिला अडीच वर्षांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय ती तिला सासरी जायचं नसून तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. तिच्या या विचित्र मागणीमुळे तिचे कुटुंबीयांशी भांडण झाले. यानंतर ती मोबाईल टॉवरवर चढली आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. ही महिला टॉवरवर चढल्याचं समजताच घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी जमली शिवाय या महिलेच्या मागणीमुळे तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती गावकऱ्यांना समजताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
प्रियकरासाठी प्रेयसी टॉवरवर चढली अन्…
घटनेची माहिती मिळताच सीओ महेंद्र सिंह पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या ती ऐकायला तयार नव्हती. दरम्यान, प्रेमप्रकरणातून महिला टॉवरवर चढल्याचं पोलिसांना समजताच त्यांनी तिच्या प्रियकराला घटनास्थळी बोलावलं. यानंतर प्रियकराने तिची समजूत काढली आणि खाली घेऊन आला, पण यावेळी ती त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट करु लागली, या घटनेचे वृत्त आजतकने दिलं आहे.
तब्बल साडेतीन तास मोबाइल टॉवरवर होती प्रेयसी
मिळालेल्या माहितीनुसार, बारी उपविभागा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरेह गावात राहणाऱ्या २७ वर्षीय पूजाचे त्याच गावातील आकाश नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिचा विवाह बदरिका गावातील एका तरुणाशी ५ वर्षांपूर्वी झाला असून तिला अडीच वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र अनेक दिवसांपासून पूजा तिच्या माहेरी राहत असून ती आणि सासरी जायला नकार देत आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्ती करुन या महिलेला खाली उतरवल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.