सरकारी शाळेतील शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना टोंकमधील राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयात घडली असून विद्यार्थ्यांला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनिष बनेठा (१५) असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मनिष हा दररोज सायकलवरुन ६ किलोमीटर लांब असलेल्या सरकारी शाळेत जातो. नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला आणि जेवणाच्या सुट्टीत मित्रांसोबत जेवताना गप्पा मारत होता. मात्र, त्याच वेळी तेथून जात असलेल्या नरेंद्र जैन नावाच्या शिक्षकाने त्याला गप्पा मारताना पाहिलं.
शिक्षकाला मनिषचं मुलांशी बोलणं एवढं खटकलं की त्याने अक्षरश: मनिषला जमिनीवर लोळवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. शिक्षकाचा हा रुद्रावतार बघून मनिषचे मित्र भितीने तेथून पळत सुटले ते थेट त्याच्या घरच्यांजवळ गेले आणि शाळेत घडलेल्या घटनेची माहिती दिली.
शाळेत आपल्या मुलाला झालेल्या मारहाणीची माहिती मिळताच मनिषच्या घरच्यांनी शाळेत धूम ठोकली आणि त्याला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी मनिषची तपासणी केली असता, त्याच्या संपुर्ण शरीरावर जखमा आणि मणक्याला गंभीर दुखावत झाल्याचं कुटुंबीयाना सांगितलं.
मुलाला शिक्षकाच्या मारहाणीत गंभीर जखमा झाल्याचं कळताच मनिषच्या वडिलांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून त्या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा- नशिबाचा खेळ! नवऱ्याने लॉटरीत जिंकलेले एक कोटी घेऊन बायकोचा पोबारा; प्रियकराकडे गेली अन्…
दरम्यान, जिल्हा शिक्षण अधिकारी मीना लसारिया यांनी सांगितलं की, “बनेठा येथील सरकारी विद्यालात विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीत त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.आरोपी शिक्षकाला तत्काळ निलंबित केलं असून या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”