Rajasthan Shocking Video: अनेक शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरीच्या वाढत्या घटना रोखताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. कारण चोरी करून चोर अशा काही ठिकाणी पसार होतात की, त्यांना शोधणे अनेकदा कठीण होऊ बसते. त्यात हल्ली रस्त्यावरून चालतानाही चोर चलाखीने लोकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, हातातील मोबाइल हिसकावून घेऊन पसार होत असल्याच्या घटना घडताना दिसतात. मात्र, सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, यामध्ये चोरांनी एका महिलेला हिप्नोटाईज करून चक्क चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही चोरी फक्त दोन मिनिटांत झालीये, ते देखील रस्त्यावर सगळ्यांसमोर. या चोरीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही गोंधळून जाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ मिनिटांत ४ लाख रुपये केले लंपास

राजस्थानमधील उदयपूरमध्ये पतीला टिफिन देऊन परतणाऱ्या महिलेला हिप्नोटाईज करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरजपोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या शुक्रवारी महिलेकडून साडेचार लाखांचे सोने, एक मोबाइल फोन आणि रोख रक्कम चोरीला गेली होती.

हिप्नोटाईज करून केली महिलेची लूट

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती महिला तब्बल सात मिनिटे त्या व्यक्तींच्या सांगण्यांनुसार वागत आहे. त्यांनी विचारले की ती कधी मथुरेत गेली होती का, त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. मग त्यांनी विचारले की, ती कोणत्या देवावर विश्वास ठेवते आणि तिने सांगितले की ती भगवान महावीर स्वामींवर विश्वास ठेवते. यानंतर महिलेचे भान हरपले आणि तिने आपले सामान गुंडांच्या ताब्यात दिले. महिला सांगते की, या चोरांनी तिच्या डोक्यावर आणि पायावर काहीतरी शिंपडलं अन् त्यानंतर ते लोक जे बोलतील ते ती करू लागली. चोरांनी तिच्याकडे ५० रुपये मागितले. तिनं कुठलाही प्रश्न न विचारता गुपचूप पैसे काढून दिले. हे पैसे त्यांनी तिला परत केले अन् त्यानंतर काय घडलं तिला काहीच आठवत नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “मी मरेन काका, मला जाऊ द्या” दिल्ली मेट्रोमध्ये चोराला रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच

पोलिस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत, तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, आजकाल ते एक नवीन युक्ती वापरत आहेत. अनेक बातम्या पाहायला मिळतात जिथे हे लोक महिलांचे ब्रेनवॉश करतात, ज्यात महिला स्वतः सोने-चांदी आणतात आणि गुंडांना देतात. तर दुसरा म्हणतो, उदयपूरमध्ये असे प्रकार बरेच घडत आहेत. आमच्या शेजारी राहणाऱ्यांची सोनसाखळी अशाच बाबांच्या टोळीने चोरली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan shocking video woman hypnotized robbed of gold worth 4 lakhs in broad daylight on udaipur street srk
Show comments