राजस्थानमधले भाजपाचे मंत्री कालीचरण सराफ यांचा भररस्त्यात लघुशंका करताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यावरुन काँग्रेसनं सरकारवर टीका केली आहे. एकीकडे कोट्यवधी खर्चून सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारच्या एका मंत्र्याला याचा पुरेपुर विसर पडलेला दिसत आहे, कारण पक्षानं राबवलेल्या या अभियानाचा विचार न करता हे मंत्री महोदय चक्क रस्त्यावर लघुशंका करताना दिसत आहेत.
जयपुर शहर देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत यावं यासाठी तिथलं सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात स्वच्छ भारत अभियान राबवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनादेखील आवाहन केलं जात आहे तर दुसरीकडे मात्र राज्याचे आरोग्य मंत्री सराफ यांनी रस्त्यावर लघुशंका करून सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारमधलेच मंत्री असे लज्जास्पद कृत्य करून समाजात चुकीचा संदेश देत आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे. राजस्थानमध्ये रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारला जातो. तेव्हा आरोग्य मंत्री सराफ यांच्याकडूनही दंड आकारणार का? असा सवाल काँग्रेसनं केला आहे.
Viral : पर्स वाचवण्यासाठी ती चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली
बिकीनीतली सनी लिऑन करतेय शेताची राखण, शेतकऱ्याची जगावेगळी ‘डोकॅलिटी’
आयएएनएस वृत्तसंस्थेनं सराफ यांच्याशी संपर्क साधला असता ‘ही काही मोठी गोष्ट’ नाही असं उत्तर देत विषय टाळला आहे. गेल्यावर्षी राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे देखील रस्त्यात लघुशंका केल्यानं वादात सापडले होते. सोलापूर-बार्शी रस्त्याच्या कडेला त्यांनी लघुशंका केली होती याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं ते अडचणीत आले होते. त्यावेळी दौऱ्यावर असताना रस्त्यात कुठेही स्वच्छतागृह दिसले नाही, त्यामुळे उघड्यावरच लघुशंकेला जावे लागले, असे स्पष्टीकरण देत शिंदे त्यांनी वाद निस्तरण्याचा प्रयत्न केला होता.