वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. अशा परिस्थिती लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी स्विमिंग पूल, रिसॉर्ट अशा ठिकाणांचा आधार घेताना दिसतात. उन्हाळ्यात याठिकाणी तरुण, तरुणी मोठ्या संख्येने येतात. अशाचप्रकारे उन्हाळ्यात काही तरुणांना वॉटर पार्कमध्ये मोफत एन्ट्री हवी होती. मात्र मोफत एन्ट्री न मिळाल्याने तरुण संतापले आणि ते थेट बुलडोझर घेऊन वॉटर पार्कमध्ये पोहोचले, यानंतर त्यांनी असा काही गोंधळ घातला की, ते पाहून उपस्थित लोक हैराण झाले. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

राजस्थानमधील चित्तोडगड रोडवरील हमीरगडजवळील गंगरार येथील वॉटर पार्कमधील ही घटना आहे. जिथे मोफत एन्ट्री न मिळाल्याने काही लोक बुलडोझर आणि शस्त्रे घेऊन वॉटर पार्कमध्ये पोहोचले आणि गोंधळ घातला. बुलडोझरने स्विमिंग पुलचे नुकसान केले आणि शेडही पाडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे

यावेळी तरुणांनी वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करण्यास सुरुवात केली, यावेळी अर्धा तास तरुणांनी गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेसीबीच्या सहाय्याने स्विमिंग पूलची तोडफोड करण्यात आली, इतकेच नाही तर त्यांनी गोळीबारही केला, त्यामुळे घबराट पसरली. या घटनेमुळे वॉटर पार्कमध्ये मौजमजेसाठी आलेल्या लोकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.

पाऊस आला ढिंच्यांग ढिंच्याक! भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

मोफत एन्ट्री न मिळाल्याने तरुणांची गुंडगिरी

यावेळी सुमारे १०० जणांनी मिळून गोंधळ घातला आणि स्विमिंग पूलची तोडफोड केली. वॉटर पार्कमध्ये तोडफोड आणि गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. वॉटर पार्कमधील तोडफोडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशी गुंडगिरी पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांकडे दोन तक्रारी आल्या असून त्यामध्ये वॉटर पार्क चालकावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, तर वॉटर पार्क चालकाने माजी प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

Story img Loader