Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच रिलच्या नादात आपल्या लहान बाळाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं..याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये इंस्टाग्राम रील्ससाठी राजस्थानच्या झालावाडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या गुर्जर का ढाबा परिसरात एका लहान मुलाचा जीव धोक्यात घालून त्याला एका वेगवान कारच्या बोनेटवर बसवले आहे. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि शेअर्ससाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे या घटनेने सिद्ध केले आहे. या व्हिडीओमुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून, याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आई-वडिलांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई-वडिल आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असतात, पण तेच मुलाच्या जीवावर उठले तर काय?

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

व्हिडिओमध्ये भरधाव वेगात धावणाऱ्या काळ्या रंगाच्या मारुती अल्टो कारच्या बॉनेटवर एक लहान मूल दिसत आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाचे वय सुमारे १०-१२ वर्षे आहे आणि इंस्टाग्रामसाठी रील शूट करण्यासाठी कार चालकाने त्याचा जीव धोक्यात घातल्याचे वृत्त आहे. व्हिडिओमध्ये कारचा नंबरही दिसत आहे. पोलिस आरोपीला पकडण्यासाठी व्हायरल व्हिडिओ तपासत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही. व्हिडिओची नेमकी वेळ आणि तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

राजस्थानमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्तींवर स्थानिक पोलिस कारवाई करत आहेत. यापूर्वीच्या एका प्रकरणात, दोन व्यक्तींना वेगवान कारवर धोकादायक स्टंट करताना पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली आणि कायदेशीर कारवाई सुरू केली. नेटकरीही यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आई वडिलांनाच कळत नाही तर काय करणार?” तर आणखी एक म्हणतो “ अरे तुम्हाला रिल पुन्हा बनवता येईल पण लेकरु गेलं तर काय कराल सांगा?”

Story img Loader