Rajat Dalal Viral Video News : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलाल एका नवा वादग्रस्त व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो वेगाने कार चालवताना दिसत आहे. इतकेच नाही तर तो आपल्या भरधाव कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक देतो. या घटनेत दुचाकीस्वारी कोसळतो, पण रजत दलाल कशाचीही पर्वा न करता कार चालवत राहतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, तसेच त्याला अटक करण्याची मागणी केली आहे, या प्रकरणानंतर आता @trainedbyrajat नावाच्या अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात अपघाताच्या व्हायरल व्हिडीओवर रजत दलालने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या व्हिडीओमध्ये तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊ…

रजत दलालने अपघाताच्या व्हिडीओवर सोडले मौन

@trainedbyrajat नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रजत दलाल म्हणतोय की, सर्वप्रथम सर्वांना राम राम… सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोक खूप संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मी माझ्या बाजूने सांगू इच्छितो की, माझ्याकडे ना माझा कोणताही डाटा आहे, ना माझे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. मला स्वत:ला माहिती नाही तो व्हिडीयो कुठून व्हायरल झाला, कुठून आला आहे, काय सीन आहे. हा व्हिडीओ अजिबात आत्ताचा नाही.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”

रजत दलाल पुढे म्हणतोय की, मी अशा उलट-सुलट गोष्टी, मारामारी- वादविवाद, शिवीगाळ अशा गोष्टी करणं मी आता सोडून देत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला समजत नाही की, हा माझ्याविरोधात रचला जाणारा कट आहे की कोणत्या गोष्टीत मला फसवले जात आहे किंवा माझ्या नावाने व्हूज मिळण्याचा हा प्रकार आहे. मला खरंच कळत नाही हा नेमका काय प्रकार आहे.

Read More Rajat Dalal News : Video : “हे माझं रोजचच काम…”, दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या इन्फ्लुएन्सर रजत दलालने दाखविला माज; युर्जस म्हणतात…

“खरं असेल ते समोर येईल, शांतता ठेवा”, रजत दलालचे आवाहन

ना हा व्हिडीओ आत्ताचा आहे. आता देव जाणो की, एखादा कोणता व्हिडीओ येतो… मला समजत की, प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो, पण जीवनात मी सर्व गोष्टी मागे सोडल्या आहेत आणि त्यातून मी धडा घेतला आहे, तेव्हापासून मी ना कोणाशी भांडण केले ना भविष्यात करेन. मला आशा आहे की, तुम्ही या गोष्टी नीट समजून घ्या आणि जे काही खरं असेल ते समोर येईल, तोपर्यंत कृपया शांतता ठेवा, रजत दलालने असे आवाहन व्हिडीओच्या शेवटी केले आहे.

@trainedbyrajat नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, .या अकाउंटचे जवळपास 533K फॉलोवर्स आहेत. दरम्यान आत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आत्तापर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या, ज्यात अनेकांनी त्याच्यावर कडक पोलीस कारवाई करत अटकेची मागणी केली आहे.

Story img Loader