Rajat Dalal Viral Video : वादग्रस्त कृतींमुळे नेहमी चर्चेत असणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलाल याचा नवा कथित धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती रजत दलाल असल्याचा दावा केला जात आहे. जो भररस्त्यात जवळपास १४०+ किमी प्रतितास वेगाने गाडी चालवताना दिसत आहे. यावेळी त्याच्या शेजारी एक तरुणी बसलेली आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातील रजत दलालचे वक्तव्य ऐकून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुचाकी स्वाराला दिली धडक, वर दाखविला माज
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ओव्हरस्पीड कार चालवत असताना रजत दलालने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यातील धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर त्याने थांबण्याची तसदीही घेतली नाही. यावेळी त्याच्या शेजारी सीटवर एक तरुणीही बसलेली आहे, जी रजत दलालला कार हळू चालवायला सांगते; ज्यावर तो तिला बेफिकीर राहण्यास सांगितो. पण, या घटनेनंतर ती तरुणी खूप घाबरते आणि म्हणते की, सर तो दुचाकीस्वार खाली पडला, सर असे करू नका. यावर रजत दलाल म्हणतो की, ठीक आहे, मी परत असे करणार नाही… तो पडलाच ना, काही फरक पडत नाही, हे माझं रोजचं काम आहे…’ यानंतर तो गर्दीच्या रस्त्यावरील गाडीचा वेग थोडा कमी करतो. पण, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने शूट केला आहे.
दरम्यान, फरिदाबाद पोलिसांनी रजत दलाल याच्याविरोधात बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल चालान जारी केल्याची माहिती समोर येत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ एनएचपीसी मेट्रो स्थानकाजवळ शूट करण्यात आला आहे.
रजत दलालचे धक्कादायक विधान अन् कृत्य पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स त्याच्या अटकेची मागणी करत आहेत, रजत दलाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरदेखील खूप ट्रेंडमध्ये आहे.
मात्र, या घटनेप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल झाली नसल्याचेही समोर आले आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही. पण, अनेक जण व्हिडीओ पोस्ट करून दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राम पोलिसांना टॅग करत दलालला अटक करण्याची मागणी करत आहेत.
रजत दलाल अपहरण अन् मारहाणीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार
रजत दलालला यापूर्वीच एका मुलासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला तुरुंगातही जावे लागले होते. अहमदाबाद पोलिसांनी त्याला १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती.
दलालने मुलाचे अपहरण केले, त्याला टॉयलेट साफ करायला लावले आणि चेहऱ्यावर शेण लावल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याने मुलाच्या चेहऱ्यावर लघुशंकाही केली होती.
ज्या मुलाबरोबर त्याने गैरवर्तन केले, त्या मुलाने रजत दलालचा जिममध्ये सेल्फी काढला होता; यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रोज सकाळी जिममध्ये तुमचा चेहरा पाहून दिवस खराब होतो’, जेव्हा पोस्ट व्हायरल झाली आणि रजत दलालपर्यंत पोहोचली तेव्हा तो चिडला आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केले होते.
यानंतर रजत दलाल प्रथम या मुलाच्या घराचा पत्ता शोधतो, त्याला घराबाहेर बोलावतो आणि त्याच्या थार कारमध्ये त्याचे अपहरण करतो. यावेळी या मुलांनी रजत दलाल आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि त्याचा व्हिडिओ शूट केला.
यानंतर, तो मुलाला एका तबेल्यात घेऊन जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर शेण लावतो. त्याला बाथरूम स्वच्छ करायला लावतो आणि तो बेशुद्ध झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर लघवीही करतो. आता त्या मुलाप्रमाणेच रजत दलाल आणि त्याचे सहकारी त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करू लागले आहेत.