दैनंदिन जीवनातील मजेशीर तर कौतुकास्पद गोष्टी सांगताना ब्लॉगिंग किंवा रील पोस्ट करून नेटकऱ्यांचं मनोरंजन करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. तुम्ही आतापर्यंत ब्लॉगर, कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लूएन्सर यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आज एका ट्रक चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्याच्या अनोख्या गोष्टीमुळे तो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रक चालक राजेश रवानी त्याच्या अनोख्या कौशल्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या ट्रकमध्ये तो स्वतः जेवण बनवताना दिसतो आहे. मच्छीचा सार, मटणाचा सार आणि चिकनचा रस्सा बनवताना त्याचे स्वयंपाक कौशल्य ब्लॉगद्वारे दाखवतो आहे. आता तुम्ही म्हणाल की, ट्रक चालक जेवण बनवतो आहे यात काय खास आहे ? तर तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच…
हेही वाचा…पाटणाची सुप्रसिद्ध ‘धोबीपछाड इमरती’; ‘या’ व्हायरल व्हिडीओमधील स्वच्छता बघून डोक्याला लावाल हात!
व्हिडीओ नक्की बघा :
ट्रकचे रूपांतर किचनमध्ये केले आहे. ट्रकमध्ये छोटा सिलेंडर ठेवला आहे. तसेच पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रकमध्ये दिसून येतील. सुरुवातीला ट्रक चालक व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांशी संवाद साधतो. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात मच्छीचा सार बनवण्यास सुरुवात करतो. त्यानंतर रेसिपीची एक-एक कृती, साहित्य त्याच्या हटके स्टाईलमध्ये सांगताना फिश कढी बनवतो आहे; जे पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @r_rajesh_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ट्रक चालक राजेश रवानी यांनी असे बरेच व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत, ज्यात ते हटके पद्धतीत विविध पदार्थ बनवताना दिसत आहेत. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून ‘बाकीच्या इन्फ्लूएन्सरपेक्षा चांगली ओळख मिळाली आहे’, ‘ही कल्पना खूप चांगली आहे’, ट्रक चालक नाही, हा तर मास्टर शेफ आहे’; अश्या अनेक कमेंट व्हिडीओखाली तुम्हाला पाहायला मिळतील.