Rohan Joshi Comments on Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मात्र अशातच AIB या कॉमेडी ग्रुपचा भाग असलेला स्टँडअप कॉमेडियन रोहन जोशी याने मात्र दिवंगत श्रीवास्तव यांच्यावर टीका करणारी कमेंट केली आहे. यावरून रोहन जोशी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या..

कॉमेडियन अतुल खत्री यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहणारी पोस्ट केली होती, “RIP राजूभाई ❤️? तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा स्टेजवर गेलात तेव्हा तुम्ही मंच उजळून टाकला. तुमची उपस्थिती अशी होती की लोकांनी तुम्हाला पाहिले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटले. तुमची खरोखरच आठवण येईल भारतीय स्टँड-अप कॉमेडी सीनसाठी एक मोठे नुकसान? #RajuSrivastav असे कॅप्शन लिहून खत्री यांनी पोस्ट शेअर केली होती.

खत्री यांच्या पोस्टवर रोहन जोशीने कमेंट करत अत्यंत कठोर शब्दात राजू श्रीवास्तव यांना निशाणा केले आहे, अतुलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, रोहन जोशी (@mojorojo) याने म्हंटले की,

“आम्ही काहीही गमावलेले नाही. (कुणाल) कामराचा रोस्ट असो किंवा इतर कॉमिक राजू श्रीवास्तव यांनी नवीन चेहऱ्यांवर नेहमीच टीका केली. विशेषत: स्टँड अपची नवीन पिढी समोर येत असताना त्यांनी एकही संधी सोडली नाही. तो प्रत्येक न्यूज चॅनेलवर गेला आणि प्रत्येकवेळी नव्या कलाकारांना आक्षेपार्ह म्हणून टीका करून आला. त्याने कधीतरी चार चांगले जोक सांगितले असतील पण त्याला कॉमेडीची समज नाही आणि आपण सहमत नसताना इतरांचे मत कसे दाबून टाकू नये हे ही कळत नाही, बरं झालं आम्ही सुटलो.” अशा शब्दात रोहनने कमेंट केली आहे.”

पहा रोहन जोशींची राजू श्रीवास्तव यांच्यावर टीका

रोहनच्या या टीकेवरून नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावत चांगलीच शाळा घेतली आहे.

पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, या टीकेनंतर रोहन जोशी याची आक्षेपार्ह्य कमेंट अतुल खत्री यांच्या पोस्टवरून हटवण्यात आली आहे. मात्र रोहन जोशीने यासंदर्भात कुठेही माफी मागितलेली नाही.

Story img Loader