राखी सावंत आणि उर्फी जावेद या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. राखी सावंत आणि उर्फी जावेद या दोघींना मनोरंजन क्षेत्रात ड्रामा क्वीन्स म्हणून ओळखले जाते. आपल्या वक्तव्यामुळे त्या कायमच लक्ष वेधून घेतात. त्यामुळे राखी सावंत आणि उर्फी जावेद एकाच फ्रेममध्ये आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये या दोघी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
राखी सावंत आणि उर्फी जावेद त्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एकत्र थंड पेय शेअर करताना दिसत आहेत. उर्फी आणि राखी पापाराझींसाठी एकत्र पोज देताना तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या दरम्यान उर्फी आणि राखीला तहान लागली होती. राखी उर्फीला डायट कोक स्वतःच्या हाताने प्यायला लावते आणि नंतर त्याच ग्लासातून स्वतः पिते. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फी आणि राखी सावंत यांना एकाच फ्रेममध्ये बघून त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत, तर अनेक यूजर्स दोघांना ट्रोलही करत आहेत. एका यूजरने दोघांची खिल्ली उडवली आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, दोन बहिणी एकत्र आल्या. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, दोन्ही बकवास आहेत. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, दोन वेड्या महिला एकत्र आल्या आहेत.