आपल्या वेगळ्या आणि अनोख्या स्टाईलने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या राखी सावंतची (Rakhi Sawant) आज दयनीय अवस्था झाली आहे. यामागचे कारणही वेगळचं आहे. नुकताच राखीचा एक नवीन व्हिडीओ (viral Video) समोर आला आहे. राखी सावंत पूर्वाश्रमीचा नवरा रितेशवर संशय घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ती शनिवारी रात्री पोलीस स्टेशनलाही गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडताना दिसत असून तिचा प्रियकर तिला सावरताना दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन ती मीडियाशी बोलताना सांगते की, “मला माहित आहे की मी तीन वर्षे कशी काढली. लॉकडाऊनमध्येही एकटे पडले होते. म्हणूनच मी त्याला सोडले. देवाने असा पती कोणाला देऊ नये. आता त्याच्याविरुद्ध तक्रार करत आहे.” राखीचं पोलीस स्टेशनला जाण्याच कारण म्हणजे तिचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. यामागे तिचा पूर्वाश्रमीचा नवरा रितेश असल्यासचं ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

(हे ही वाचा: पाणी पिणाऱ्या सिंहाला ‘या’ व्यक्तीने मागून ढकलायचा केला प्रयत्न अन्; Video Viral)

राखी सावंतनेही सांगितले की, तिला गलिच्छ मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्याचवेळी, अभिनेत्रीचा प्रियकर आदिल दुर्रानीने सांगितले की, त्याने सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. आदिल म्हणाला, ‘अनेक प्रयत्न करूनही ती लॉग इन करू शकत नाही. ती यापुढे तिचे गुगल पे किंवा तिचा फोन देखील ऍक्सेस करू शकणार नाही.’ राखीच्या म्हणण्यानुसार, रितेश आता तिचा फोनही उचलत नाही आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घाणेरड्या भाषेत लिहित आहे. रितेश राखीच्या मेसेजलाही प्रतिसाद देत नाही.

(हे ही वाचा: चंद्रमुखीची क्रेझ कायम! ‘चंद्रा’ गाण्यावर मुलाने केलेला ‘हा’ भन्नाट डान्स एकदा बघाच; Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: …अन् क्षणार्धात खाली कोसळला पूल; उद्घाटनावेळी घडला अपघात)

एवढ्या मुसळधार पावसातही तक्रार लिहिण्यासाठी राखीने पोलिस स्टेशन गाठले. राखी बिग बॉस सीझन १४ आणि १५ मध्ये दिसली होती. यासोबतच ती तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र इन्स्टा आणि फेसबुक हॅक झाल्यामुळे ती नाराज झालेली दिसली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant instagram facebook hacked reached to police station with boyfriend ttg