लंडनला पाठवण्यात आलेली राखी फ्रान्सला पोहचल्याने कुरियर कंपनीला २५ हजारांची रक्कम नुकसा भरपाई म्हणून द्यावी लागली आहे. बेंगळुरु येथील DTDC एक्स्प्रेस लिमिटेड कंपनीला ही भरपाई द्यावी लागली आहे. शिवानी शर्मा यांना जो काही मनस्ताप २६ ऑगस्टला राखी पौर्णिमा होती त्यामुळे शिवानी शर्मा यांनी कमिंदर सिंग यांना राखी लंडनमध्ये राखी पाठवली. लंडन येथे राखी मिळावी म्हणून त्यांनी १३ ऑगस्टलाच कुरियर केले. आम्ही एक आठवड्यात तुमची राखी पोहचवू असे आश्वासन DTDC एक्स्प्रेस लिमिटेड कंपनीने त्यांना दिलं. मात्र ही राखी वेळेत मिळणं तर सोडूनच द्या लंडनला पोहचलीच नाही. त्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला असं राखी पाठवणाऱ्या शर्मा यांनी म्हटलं आहे.
मी कुरियर कंपनीकडे वारंवार राखी मिळाली का? याबाबत विचारणा केली मात्र त्यांच्याकडून मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर मी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला असेही शिवानी शर्मा यांनी म्हटले आहे. ग्राहक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ग्राहक न्यायालयाने कुरियर कंपनीने शिवानी यांना २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी असे म्हटले आहे.
राखी ही गोष्ट आहे जी एक दिवस आधी किंवा किमान राखी पौर्णिमेच्या दिवशीच मिळायला हवी. बहिण आणि भाऊ यांच्यातल्या पवित्र नात्याचं हे अनोखं बंधन आहे त्यामुळे लोकांच्या भावना त्याच्यासोबत गुंतलेल्या असतात. त्यामुळे ही राखी न पोहचणे किंवा भलत्याच ठिकाणी पोहचणे हे क्षम्य नाही असे मत ग्राहक मंचाचे प्रमुख जी.के धीर यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार बेंगळुरु येथील DTDC ट्रेडर्स आणि रिषभ ट्रेडर्स यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असे म्हटले आहे.