Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या निमित्त बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. याबदल्यात भाऊ बहिणीला गिफ्ट व सदैव रक्षण करण्याचे वचन देतो ही प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे. मात्र आता केवळ भाऊच नाही तरी बहिणीसुद्धा भावाचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गोरखपूर मधील इंजिनियरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक अशी राखी तयार केली आहे जी भावाच्या मनगटाची शोभा वाढवण्यासह त्यांचे रक्षण सुद्धा करणार आहे. गोरखपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी अँड मॅनेजमेंट इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तयार केलेली ही डिजिटल राखी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गोरखपुर मधील कॉम्प्युटर सायन्स व इंजिनियरिंग विभागाची विद्यार्थिनी पूजा यादव व फार्मसी विभागातील रानी ओझा या दोघींनी मिळून ही स्मार्ट डिव्हाईस राखी तयार केली आहे. या राखीवर एक बटण दिलेले आहे जे दाबताच संकटाच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही संकटात असल्याची माहिती दिली जाईल. इतकंच नव्हे तर अपघात झाल्यास सर्वात आधी तुमच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती देऊन तुमच्यासाठी रक्ताची व आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा ही राखी करते.

पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानमधील बहिणीने भावासाठी यंदाही पाठवली राखी; म्हणाल्या, “२०२४ मध्ये…”

ही राखी तयार करणाऱ्या पूजा व रानी यांनी या राखीला मेडिकल सेफ्टी राखी असे नाव दिले आहे. सहसा बाईक किंवा कार चालवताना अपघात झाल्यास कुटुंबियांना फार उशिरा समजते. जर अशावेळी त्वरित मदत मिळाली तर अपघातग्रास्तांचे जीव वाचवण्यात मदत होऊ शकते. याच समस्येवर उपाय शोधताना या विद्यार्थिनींनी ही राखी बनवली आहे. गाडी चालवताना आपण ब्लूटूथ वापरून राखी मोबाईलला जोडू शकता. स्मार्ट मेडिकल राखी मध्ये आपण डॉक्टर, रुग्णवाहिका व कुटुंबियांचे मोबाईल नंबर जोडू शकता, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राखीवर डबल टॅप केल्यावर तुम्ही सेट केलेल्या क्रमांकाला अपडेट केले जाईल.

अगदी हाय टेक अशी ही मेडिकल सेफ्टी राखी अवघ्या ९०० रुपयात बनवण्यात आली आहे, या राखीमध्ये ब्लूटूथ सह अन्य नॅनो पार्ट वापरलेले आहेत. एकदा चार्जिंग झाल्यावर साधारण १२ तास राखी वापरता येईल जी गाडी चालवताना ब्लूटूथशी जोडून सुद्धा आपण वापरू शकता.

Story img Loader