Traffic Police’s special gift to women drivers on Raksha Bandhan : आज १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. आजचा दिवस हा भाऊ-बहिणीसाठी खास मानला जातो. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. पण, नागरिकांच्या सुख-दुःखात त्यांचं संरक्षण करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना विसरून कसं चालेल? तर आज ट्रॅफिक पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांचं नागरिकांप्रति असणारं प्रेम व्यक्त केलं आहे. ते आज त्यांच्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचं एक खास गिफ्ट घेऊन आले आहेत. हे गिफ्ट नक्की काय आहे ते चला जाणून घेऊयात…

ट्रॅफिक पोलिसांनी यंदा रक्षाबंधन थोडं ट्विस्ट देऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वाहतूक जागृतीसाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे. रक्षाबंधनानिमित्त आज महिलांकडून कोणताही ट्रॅफिक दंड (चलन) घेतला जाणार नाही. त्याशिवाय या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते महिलांना हेल्मेटचं वाटपदेखील करणार आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी नोएडा ट्रॅफिक पोलिस वाहतूक सुरक्षेला चालना देण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविणार आहेत.

Raksha Bandhan Viral Video of little girl funny video on social media on rakhi day
Raksha Bandhan: “तू मला वेडी…”, भावाला राखी बांधताना चिमुकलीच्या स्वॅगने केली सगळ्यांची बोलती बंद; रक्षाबंधनाचा VIDEO VIRAL
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Video Ten year old boy sings traffic awareness self-composed songs
मूर्ती लहान; पण कीर्ती महान! वाहतुकीचे धडे देणारं चिमुकल्याचं गाणं; चॉकलेट, कट-आउट दिले अन्… पाहा कौतुकास्पद VIDEO
Akola Garlic Is Made From Cement Video Of Food Adulteration Goes Viral shocking video
सावधान! बाजारात आलाय सिमेंटचा लसूण; महाराष्ट्रात फसवणुकीचा पर्दाफाश, VIDEO पाहून सांगा या लोकांना कोणती शिक्षा करावी
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हेही वाचा…‘आयुष्य सर्वांसाठी सारखं…’ प्रवाशाला चहा देण्यासाठी चहा विक्रेत्याची धडपड; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल चटकन पाणी

महिलांची ‘ट्रॅफिक’ दंडापासून सुटका :

रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan )आज महिलांना कोणतेही वाहतूक चलन जारी केले जाणार नाही आणि त्यामुळे त्यांना दंडाची चिंता न करता, त्यांच्या भावांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल, असे नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं आहे. पण, ही बाब लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे की, जर महिलांनी महत्त्वपूर्ण वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा सण वाहतुकीचे नियम लक्षात घेऊन साजरा केला जाईल याकडे नोएडा ट्रॅफिक पोलिस यांचे लक्ष आहे.

रक्षाबंधन हा जगभरातील भारतीयांमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे; ज्याला सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. तर, त्यानिमित्तच प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेसाठी आज ट्रॅफिक पोलिस एक खास गिफ्ट घेऊन आले आहेत. राखी बांधल्यानंतर काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता प्रत्येक बहिणीला असते. तर आज वाहतुकीचे नियम पाळत, रक्षाबंधनाचा सण कशी रीतीनं साजरा करता येईल याचं उत्तम उदाहरण नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी सर्वांसमोर ठेवलं आहे. ते महिलांना रक्षाबंधनचं गिफ्ट देणार आहेत.