Raksha Bandhan viral video: जगात भावा-बहिणीचे नाते खूप पवित्र आणि सुंदर मानले जाते. येत्या १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. अनेक बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाची तयारी करत असतील. या दिवसात सोशल मीडियावरही भावा-बहिणीच्या नात्यावरील आधारित गाणी सतत चर्चेत असतात. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये भाऊ-बहीण रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहेत. पण, यावेळी अचानक असं काही होतं जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बऱ्याचदा मनोरंजनासाठी बनवले जाणारे अनेक व्हिडीओ ठरवून बनवले जातात. पण, काहीवेळेस नकळत एखादी घटना व्हिडीओमध्ये शूट होते. या व्हिडीओतील ही घटनादेखील अशाप्रकारे घडली असल्याचे दिसत आहे.

Bride's Father Calls Off Wedding After Groom Dances
Viral News : नवरदेवाचे स्वत:च्याच लग्नात ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यावर ठुमके; मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बहीण भावाला राखी बांधून त्याला घास भरवण्यासाठी त्याच्या जवळ जाते. पण, यावेळी नकळत औक्षणाच्या ताटातील दिवा भावाच्या दाढीला लागतो आणि दाढीला आग लागते. भाऊ लगेच लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे धोका टळतो. ही घटना काही जण जरी गंमत म्हणून पाहत असले तरीही रक्षाबंधन करते वेळी अशी घटना तुमच्याबाबतीत होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. दरम्यान, सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून अनेक जण यावर विविध कमेंट्स करत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @navneet_051 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर एक मिलियनहून अधिक आणि १६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: आईशप्पथ! तरुणी रिक्षाच्या पुढचे चाक पाठीवर ठेवून काय करतेय? VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “आजपासून मोठी दाढी ठेवणं बंद”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे पाहून मलाही दाढी कापावी लागेल.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बहुतेक बहिणीला गिफ्ट नाही दिलं म्हणून असं झालं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “दाढी वाढवण्याचे दुष्परिणाम.”

Story img Loader