डेटिंग ऍपवर पार्टनर शोधण्यासाठी अनेकजण जातात. यातील काहींच्या लव्ह स्टोरीज इथून सुरु होऊन इथेच संपतात तर काहींच्या अगदी आयुष्यभर टिकतात. केवळ पार्टनरचे कशाला पण अनेकदा डेटिंग ऍप वर मित्र मैत्रिणी सुद्धा भेटतात. पण सध्या एक पट्ठ्या डेटिंग ऍप वर चक्क बहीण भेटल्याचे सांगत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण म्हणून फिरण्यासाठी मुलगी हवी आहे अशा पद्धतीचा एक बायो सध्या ऑनलाईन बराच चर्चेत आहे. कदाचित विश्वास बसणार नाही पण याच बायोवरून या तरुणाला चक्क एक नव्हे तर दोन दोन बहिणी मिळाल्या आहेत आणि हो ते सुद्धा डेटिंग ऍप वरच! काय आहे हे पूर्ण प्रकरण चला पाहुयात..

रक्षाबंधनच्या दिवशी एकटं वाटू नये म्हणून आपल्याकडेही बहीण असावी अशी एका तरुणाची इच्छा होती, यासाठी त्याने थेट टिंडर वर “रक्षाबंधनासाठी बहीण शोधत आहे,” असा बायो लिहिला. इथूनच दोन मुलींशी त्याचे प्रोफाइल मॅच झाले आणि यंदा ते तिघेही भेटून रक्षाबंधन साजरा करणार आहेत. याविषयी त्याने Reddit वेबसाईटवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

रक्षाबंधनासाठी बहीण शोधत आहे…

रक्षाबंधनासाठी बहीण शोधत आहे… (फोटो: Reddit)

NotaKindGuyAnymore या पेजवरून सुरु झालेल्या या संवादात त्याने प्रथम टिंडरचे आभार मानत, “मी खूप आनंदी आहे की आता मला दोन बहिणी आहेत, ज्या मला टिंडरवर भेटल्या व या वर्षी आम्ही तिघेजण एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे करण्याचा विचार करत आहोत” असे सांगितले आहे. या भन्नाट बायोवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देत या युजरच्या क्रिएटिव्ह डोक्याचं कौतुक केलं आहे.

दरम्यान अशाप्रकारे वेगळ्याच कारणासाठी डेटिंग ऍप वापरला गेल्याचे हे पाहिलेहक उदाहरण नाही. यापूर्वी ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एकाने “मी Sapiosexual नाही. मुंबईत भाड्याने फ्लॅट शोधत आहे, तुम्ही मुंबईत असाल तर उजवीकडे स्वाइप करा आणि मला हिंदी येत नसल्याने वेस्टर्न लाईनमध्ये भाड्याने जागा शोधण्यात मदत करा.” असा बायो लिहून आपले काम करून घेतले होते.

Story img Loader