रक्षाबंधन सणाची धामधूम सुरू झाली आहे. बहीण- भावंडांची हटके गिफ्ट घेण्याची तयारी सुरू असताना सध्या सोशल मीडीयामध्ये एक व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे. कोणताही सण किंवा कोणताही कार्यक्रम होण्यापूर्वीच अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. मग ते चांद्रयान-३ च्या लँडिंगबद्दल असो किंवा रक्षाबंधनाबद्दल, आजकाल सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल होत आहेत, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की तुम्हाला ते स्वतः ट्राय करावेसे वाटतील. जसं की सध्या क्यूआर कोड असलेली मेहेंदी इंटरनेटवर व्हायरल होत आहे, स्कॅन करून कोणता भाऊ त्याच्या बहिणीला पैसे ट्रान्सफर करू शकतो.  मात्र, मेहंदी क्यूआर कोडद्वारे खरंच पैसे पाठवले जाऊ शकतात का? हे जाणून घेऊयात.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक मुलगी हातावर मेहंदी लावताना दिसत आहे. मेहंदी दिसायला खूप सुंदर दिसत आहे, पण जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला दिसेल की या मेहंदीवर एक QR कोड बनवला गेला आहे. एवढेच नाही तर एक व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफरही करत आहे.

व्हिडिओ मागील सत्य समोर

हा मूळ व्हिडिओ @yash_mehndi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. मेहंदीच्या डिझायनमध्य क्यूआर कोड टाकणे, काही मोठी गोष्ट नाही. मात्र, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मेहंदी क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवण्याचा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डींगद्वारे तयार करण्यात आला आहे. हा क्यूआर कोड पेमेंटसाठी वापरला जाऊ शकत नाही, असे स्वत: ज्यांनी हा व्हिडिओ तयार केलाय, त्यांनीच सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: “आमच्या आत्यानी चांद्रयानाला चाकं बसवलेत, आमचे नाना तर लटकून चंद्रावर गेले” गावच्या पोरांच्या गप्पा ऐकून पोट धरुन हसाल

या डिजिटल मेहंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून १.२५ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. एका वापरकर्त्याने यावर टिप्पणी केली की तंत्रज्ञानाने खरोखर खूप प्रगती केली आहे. आणखी एका युजरने लिहिले की, कलाकाराला ११ तोफांची सलामी दिली पाहिजे. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले की मला माझ्या हातावर अशी क्रिएटिव्ह मेहंदी लावायला आवडेल. त्याचप्रमाणे अनेक युजर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या तर काहींनी याला फेकही म्हटले.