अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राम मंदिरात काही तासांत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी या निमित्ताने गाणी लिहिली आहेत. यामध्येच ‘राम राम आएंगे’ हे गाणं तर सध्या चांगलं ट्रेंड होतंय. विशेष म्हणजे, हे गाणं AI ने चक्क दिवंगत लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असून त्यातून दीदींना आदरांजली वाहिली आहे आणि आता हे गाणं सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात गायले भजन
‘राम आएंगे’ हे गाणं पुन्हा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यावेळी आवाज भारताच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले असून लोकांनाही ते खूप आवडले आहे. खरं तर, एआयने हे आश्चर्यकारकच काम केले आहे, AI च्या मदतीने “राम आयेंगे…” हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून लोकांना खूप आवडले आहे.
(हे ही वाचा : VIDEO: “रघुपती राघव राजा राम” युरोपियन नागरिकाने नाचत हटके स्टाइलने गायले रामाचे भजन )
“राम आयेंगे…” हे मुळ गाणं प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रानं गायलं आहे. तिच्या गाण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं होतं. आता एका AI वापरकर्त्याने चक्क लता मंगेशकर यांच्या आवाजातील हा व्हिडीओ युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. AI आणि साऊंड इंजिनिअरिंगच्या मदतीने त्याने हा ऑडिओ तयार केल्याचं सांगितलं जात आहे. यात संबंधित गायक, संगीतकार, यांचा आदर ठेवूनच ही कृती करण्यात आली असल्याचं त्यानं म्हटलं आहे, तर कोणत्याही आर्थिक लाभासाठी हा ऑडिओ तयार केला नसल्याचंही व्यक्तीनं स्पष्ट केलं आहे.
येथे ऐका गाणं
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, “हा एक चांगला प्रयत्न आहे.” दुसऱ्यानं म्हटले, “इतके गोड आवाज आहे की मी ते तासनतास् ऐकत राहते.”, अशा प्रकारच्या गोड प्रतिक्रिया या गाण्यावर येत आहेत.