Ram Lalla Viral Video: अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या बालरुपाच्या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा सोहळा काल(ता.२२) मोठ्या थाटामाटात पार पडला. देशभरात दिवाळीसारखे उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुर्तीची पुजा आणि प्राण-प्रतिष्ठा करण्यात आली. घरोघरी दिव्यांची आरास करण्यात आली होती. चौकाचौकामध्ये रांगोळी काढण्यात आली होती. लोक प्रभू रामाच्या स्वागतासाठी आनंदाने नृत्य करताना दिसले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली श्री राम यांची मूर्ती. अरुण योगीराज यांनी कृष्ण शिळा दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. २०० किलो वजनाची ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे. ५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती ५१ इंची आहे जी गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. मूर्तीचे अनावरण अयोध्या मंदिरातील भव्य ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी करण्यात आले. तेव्हा सोशल मीडियावर अनेक फोटो – व्हिडीओ व्हायरल झाले. पण आता रामलल्लांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये राम मंदिरातील सुंदर सावळी मूर्ती दिसते आहे पण ही मूर्ती अगदी जीवंत असल्यासारखी भासते कारण रामलल्लांच्या चेहऱ्यावरील लोभस हास्य आणि हसरे डोळे पाहायला मिळत आहे. डोळ्यांची हालचाल, पापण्यांची उघडझाप पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच प्रश्न पडला आहे की हे घडले कसे? हा एक भास होता की सत्य?
हेही वाचा – रामलल्लांच्या माथ्यावरील ११ कोटी रुपयांच्या मुकुटात दडलेले ‘हे’ बारीक पैलू पाहा, कसा व कोणी घडवला राजमुकुट?
बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील मनमोहक भाव पाहून प्रभू राम सजीव रुपात असल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये, कारण हे दृश्य पाहून लोक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.
हेही वाचा – राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी भाविकांच्या प्रसाद बॉक्समध्ये कोणते ७ पदार्थ होते? फोटो आला समोर
पण हा व्हिडिओ खरा नसून ही सर्व एआय तंत्रज्ञानाची कमाल आहे. व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून बनवला गेला आहे. ज्यांना AI माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडीओ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. पण हा व्हिडीओ एआय निर्मित आहे. a तंजली आयुर्वेद लिमिटेडचे एम.डी आणि पतंजली योगपीठ हरिद्वारचे सह-संस्थापक आचार्य बाळकृष्ण (@Ach_Balkrishn) यांचे अधिकृत एक्स खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पतंजलीसह रामललाच्या AI ला रुपाचे घ्या दर्शन” सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका युजरने व्हिडिओवर कमेंट केली की, ‘मी हा व्हिडीओ पाहणार नव्हतो पण, पाहिल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली.’ दुसऱ्याने कमेंट केली की, ‘व्हिडिओमध्ये रामलल्ला अधिक दिव्य दिसत आहेत.’