Ayodhya Ram Mandir chopper shoot : राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आता प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाचे विधी पार पडला. यात आता प्रभु रामाचे प्रथम दर्शन लाखो देशवासियांना घेता आले, यामुळे संपूर्ण देशभरात चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेलिकॉप्टरमधून काढलेला अयोध्येचा एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आलेल्या व्हिडीओत अयोध्येतील भगवमय वातावरण पाहायला मिळतेय. अयोध्येतील घराघरावर प्रभु रामाचा फोटो असलेले भगवे ध्वज फडकताना दिसत आहेत.
‘भारत का बच्चा बच्चा’ गाण्यावर ट्रेनमधील प्रवाशांनी घेतला नृत्याचा आनंद; पाहा VIDEO
अयोध्या झाली भगवीमय
अयोध्येतील रस्ते आणि सर्व लहान-मोठ्या इमारती भगव्या झेंड्यांनी सजलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लता मंगेशकर चौकात राम मंदिराचे प्रभू राम असलेले कटआऊट लावण्यात आले आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करणार आहेत. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक पंथांचे प्रतिनिधी या ऐतिहासिक अभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.