Ram Mandir Ayodhya : २२ जानेवारी हा भारतासाठी खूप खास दिवस आहे कारण १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता. तो वाद संपुष्टात आला असून राम मंदिराचे या खास दिवशी उद्घाटन होणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते औपचारिकरित्या धार्मिक पूजा आणि विधी केल्यानंतर रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळत आहे. देशात अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे. राम भक्त रस्त्यावर रॅली काढून आणि दिवे लावून आनंद साजरा करताना दिसत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत सुद्धा साजरा केला जात आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील राम भक्त टेस्ला कारच्या लाइट्सच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की अमेरिकेतील राम भक्तांनी टेस्ला म्यूझिक लाइट शो आयोजित केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जवळपास २०० टेस्ला कारनी एकत्र येऊन ‘राम’ हे नाव साकारलेले दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या टेस्ला कार रामच्या आकारात उभ्या आहेत. रात्रीच्या वेळी या टेस्ला कारच्या हेडलाइट्स आणि टेललाइट्स संगीतच्या तालावर रंग बदलत आहे. या व्हिडीओमध्ये रामाचे गीत सुद्धा लावून वातावरण भक्तीमय झालेले दिसत आहे. अमेरिकेत असा म्यूझिक लाइट शो तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल.

हेही वाचा : VIDEO : तुमच्याही गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का? भर रस्त्यात महाराजांच्या प्रतिमेवरील धूळ स्वच्छ करताना दिसला तरुण

पीटीआयने हा सुंदर क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. या वेळी अनेक राम भक्त येथे उपस्थित होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी अमेरिकेचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी कमेंट्समध्ये जय श्री राम सुद्धा लिहिलेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir ayodhya vishwa hindu parishad indian american tesla car owners organised an epic tesla musical light show in maryland ahead of the ram mandir pran pratishtha in ayodhya ndj