Ram Mandir: प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. रामभक्तांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे दरम्यान पश्चिम बंगालच्या सिलीगुडीतील एका कलाकाराने अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे चित्र आपल्या नखावर रेखाटले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश शहा हे एक मायक्रो आर्टिस्टआहेत, जे अतिशय लहान आकाराची चित्रे बनवण्यासाठी ओळखले जातात. रमेश शहा हे या कलेतील जगातील प्रसिद्ध लोकांपैकी एक आहेत. त्यांच्या या कलेसाठी त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही समावेश करण्यात आला आहे. मायक्रो आर्टिस्ट रमेश शहा यांनीने ब्रश, काळ्या रंगाचा वापर करून राम मंदिराची भव्यता अंगठ्याच्या नखावर कोरली आहे.

हेही वाचा – ‘राम आएंगे’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह केले नृत्य; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १६ जानेवारी रोजी शरयू नदीपासून सुरुवात झाली आणि आज अभिजित मुहूर्तावर मंदिराच्या उद्घाटनाने सोहळा सुरू झाला झाली. १७ जानेवारी रोजी प्रभु रामाची ५ वर्षाच्या बालरुपातील नवीन मूर्ती मंदिरात दाखल झाली. ‘प्राण प्रतिष्ठा’ आणि मंदिराच्या भव्य उद्घाटनापूर्वी अयोध्येत स्थानिकांच्या टाळ-मृदंगाने दुमदुमली होती.

हेही वाचा –Fact Check : राम मंदिराबाहेरील ड्रोन शोचा व्हिडीओ व्हायरल? समोर आली खरी बाजू

सोमवारी दुपारी भव्य मंदिरात रामाच्या मुर्तीचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा पार पडला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. देशभरातून निवडलेल्या पुरोहितांकडून समारंभाचे कार्य करण्यात आले. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली पुरोहितांच्या गटांचे नेतृत्व करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir devotee captures ayodhya temples grandeur on his nail in viral video snk