Ram Mandir Optical Illusion: अयोध्येच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात काल राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या अभूतपूर्व सोहळ्याचा डंका केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वाजला होता. अगदी न्यूयॉर्क, फ्रान्स इतकंच नव्हे तर पाकिस्तानातसुद्धा राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त आनंद उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. राम मंदिराचे शेकडो फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण आज आमच्या नजरेत एक असा फोटो आला आहे जो पाहून खरोखरच थक्क व्हायला होते. म्हटलं तर एडिटिंगची कमाल आणि म्हटलं तर चमत्कार अशी काहीशी भावना या फोटोकडे बघून मनात जागृत होते. आतापर्यंत या रीलला कोट्यवधींनी पाहिले आहे तर अजूनही सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेमकं असं यामध्ये आहे तरी काय हे पाहूया..
मंडळी तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार कदाचित माहित असावा म्हणजे थोडक्यात काय तर एखादी गोष्ट समोरासमोर पाहिली तर ती ठराविक स्वरूपात दिसते पण तुम्ही एखाद्या वेगळ्या बाजूने हीच गोष्ट पाहिली तर त्यातून फक्त वेगळे दृश्य नाही तर अर्थ सुद्धा समोर येत असतात. ऑप्टिकल इल्युजन चाचणी काही स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा उमेदवारांचे दृष्टिकोन व कल्पकता जाणून घेण्यासाठी पार पडते. आता व्हायरल होणारी राम मंदिराची ही प्रतिमा सुद्धा ऑप्टिकल इल्युजनचाच एक भाग आहे असे म्हणता येईल. यामध्ये म्हटल्याप्रमाणे राम मंदिर एका अशा दृष्टिकोनातून दाखवण्यात आले आहे की तुम्ही थोडे डोळे लहान करून किंवा अर्धे बंद करून पाहिले तर तुम्हाला चक्क राम नामाचे दर्शन होऊ शकते. तुम्हाला असं काही दिसतंय का हे आधी पाहा..
हे ही वाचा<< रामलल्लाच्या माथ्यावरील ११ कोटी रुपयांच्या मुकुटात दडलेले ‘हे’ बारीक पैलू पाहा, कसा व कोणी घडवला राजमुकुट?
दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून हा अद्भुत चमत्कार असल्याचे म्हंटले आहे. जय श्री राम म्हणत अनेकांनी या रीलवर कमेंट केली आहे. आम्ही हे ही स्पष्ट करू इच्छितो की व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे खरोखरच राम मंदिराच्या वास्तूची रचना केल्याचे ठोस पुरावे नाहीत, हा दृष्टिकोनाचा फरक आहे. मंदिराची काही मूळ वैशिष्ट्य पाहायची झाल्यास हे पारंपारिक नगारा शैलीत बांधलेले राम मंदिर लांबीने (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदीने २५० फूट आणि उंचीने १६१ फूट आहे. एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असलेले हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला २० फूट उंच आहे.