अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी प्रभु राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. देशभरात हा दिवस उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. जगभरामध्ये विविध ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसून आले. सोशल मीडियावर राम मंदिराचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहे. मंदिराची रचना अत्यंत अप्रतिम आहे याची झलक देणारे काही व्हिडीओ समोर येत आहे. हे व्हिडीओ फोटो पाहून एखादा चमत्कार असल्याचा भास होतो. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेल्या व्हिडीओमध्ये असे काय आहे ते जाणून घेऊ या…
सोशल मीडियावर तुम्ही अनेक ऑप्टिकल इल्यूजन पाहिले आहेत. काही फोटो व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये काही ना काही कोडं दडलेले असते तर काही पाहताक्षणी वेगळे वाटतात पण नीट पाहिल्यावर त्यातील गंमत समजते. थोडक्यात काय तर असे फोटो जे एक प्रकारचा भ्रम निर्माण करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही ऑप्टिकल इल्यूजन बाबत का सांगत आहोत…तर मंडळी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असेला राम मंदिराचा फोटो देखील ऑप्टिकल इल्यूजनचा एक प्रकार आहे.
राम मंदिराच्या या व्हिडीओची कमाल जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडेसे डोळे बारीक करून करून किंवा अर्धे बंद करून पाहायचे आहे…तुम्हाला प्रभु राम यांचे दर्शन होईल. ही सर्व कमाल ऑप्टिकल इल्यूजनची आहे. या आधी सोशल मीडियावर राम मंदिराच्या रचनेचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये डोळे बारीक करून पाहाताच जय श्री राम दिसत होते.
हेही वाचा – आंदोलन करणाऱ्या तरुणीला महिला पोलिस कर्मचार्यांनी केसांना पकडून नेले फरफटत, पाहा धक्कादायक Video
हेही वाचा – महिनाभर मोबाईल फोनशिवाय राहून दाखवा आणि कमवा ८ लाख रुपये; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर
व्हायरल व्हिडीओ अनेकांना अद्भूत चमत्कार वाटत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून जय श्री राम असे लिहिले आहे. आम्ही हे ही स्पष्ट करू इच्छितो की, व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे खरोखरच राम मंदिराच्या वास्तूची रचना केल्याचे ठोस पुरावे नाहीत, हा दृष्टिकोनाचा फरक आहे.
मंदिराची काही मूळ वैशिष्ट्य पाहायची झाल्यास हे पारंपारिक नगारा शैलीत बांधलेले राम मंदिर लांबीने (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदीने २५० फूट आणि उंचीने १६१ फूट आहे. एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असलेले हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला २० फूट उंच आहे.