कोट्यावधी राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ ला या मंदिरात श्री रामाचे बाल रूप रामलालाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. अतिशय भव्य असे हे राम मंदिर भाविकांसाठी २२ जानेवारी २०२४ पासून खुले होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका तरुणानं दिल्ली मेट्रोमध्ये भगवान रामाचे सुंदर भजन गात आहेत.हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मुले गिटारवर राम मंदिराच्या उभारणीबाबतचे गाणे म्हणत असलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुण कलाकार दिल्ली मेट्रोच्या आत गिटार वाजवताना भगवान रामाचे सुंदर गाणे गात आहे, तर दुसरा मुलगा गिटार वाजवत असलेला दिसत आहे. “मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढने लगा है | मदिंर जब बन जायेगा तो सोच नजारा क्या होगा…जय श्री राम..” असे या गाण्याचे बोल आहेत. मेट्रोमध्ये प्रवास करणारे इतर प्रवासीही गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. यूजर्स हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबईत काळ्या मुंग्यांचा सरबत होतोय व्हायरल; पिण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा VIDEO
२२ जानेवारी, २०२४ रोजी या मंदिराचे लोकार्पण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर अभिषेक करतील.
रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये
दगड पाणी शोषणार नाही, वातावरणातील कार्बनसोबत रिऍक्ट करणार नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आलेत. ज्यांची चाचणी कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आलीये. या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे. तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल. दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल.