Ram Navami 2024 Wishes : हिंदू धर्मात रामनवमी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता. भारतात राम नवमी उत्साहात साजरी केली जाते. यंदाची रामनवमी विशेष असणार आहे. कारण या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यंदाच्या रामनवमीला अयोध्या लखलखत्या दिव्यांनी उजळून निघेल, यात शंका नाही. या खास दिवशी अनेक रामभक्त एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतात. आज आम्ही तुम्हाला राम नवमीच्या शुभेच्छांचे फोटो आणि हटके संदेश सांगणार आहोत. तुम्ही या शुभेच्छा कुटुंब, मित्र आणि तुमच्या शुभचिंतकांना पाठवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छंद नाही रामाचा
तो देह काय कामाचा
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करू या साजरा
तुम्हाला सर्वांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईटाचा त्याग कर
सत्याची कास धर
अरे माणसा, जरा प्रभू रामांच्या विचारांची कास धर
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi

हेही वाचा : Ram Mandir: अयोध्येत ५०० वर्षानंतर धुमधडाक्यात राम नवमी; ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद, १९ तास होणार रामलल्लाचे दर्शन

राम नाम ज्याच्या मुखी
तो नर धन्य तिन्ही लोकी
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा :

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि प्रेम आणो ही प्रार्थना,
श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

सीतेचे धैर्य दिसते आईमध्ये..
रामाचा त्याग दिसतो बाबामध्ये..
तेच माझे राम सीता
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi

श्री राम राम रामेति,
रमे रामे मनोरमे …
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांच्या मनात श्रीराम आहे
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे.
रामनवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi

मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत श्रीराम
त्यांचा आदर्श घेऊन करा प्रत्येक काम
राम नवमीच्या शुभेच्छा!

राम सुरूवात आहे आणि रामच शेवट आहे
जीवन कसे जगावे, हे रामाकडून शिका
रामनवमीच्या शुभेच्छा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami wishes images messages hd photos and status for whatsapp and facebook happy ram navami ndj