Ram Navami 2025 Wishes : रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख सण आहे. या दिवशी श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभर साजरा केला जातो. धार्मिक मान्यतानुसार, चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला होता. त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो.
श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. श्रीराम सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले. श्रीरामांचे जीवन त्याग, कर्तव्य, आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते. रामनवमी निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना रामनवमीच्या शुभेच्छा संदेश पाठवू शकता. आज आपण काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत.
जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करू या साजरा
तुम्हाला सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम सुरूवात आहे आणि रामच शेवट आहे
जीवन कसे जगावे, हे श्रीरामाकडून शिका
रामनवमीच्या शुभेच्छा
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम नाम ज्याच्या मुखी
तो नर धन्य तिन्ही लोकी
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
सीतेचे धैर्य दिसते आईमध्ये..
रामाचा त्याग दिसतो बाबामध्ये..
तेच माझे राम सीता
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री राम राम रामेति,
रमे रामे मनोरमे …
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाच्या जीवनात
आणि जगण्यात राम येवो
हीच इश्वरचरणी प्रार्थना..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रामाचा आदर्श घेऊन करा
आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
राम नवमीच्या शुभेच्छा
राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे.
रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!