Shocking video: डोंगर, दऱ्या व नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडत नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये एका वेगळ्याच नेत्रसुखाची मजा अनुभवता येते. मात्र, असे म्हणतात की, आग, हवा अन् पाण्याशी कधीही खेळू नये. कारण- ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओ, तर कधी मोबाईलद्वारे सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावले आहेत. नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना १० वेळा विचार कराल.

१० सेकंदात महिलेला घडली आयुष्यभराची अद्दल

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करीत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचतात. काही जण समुद्रकिनारी जातात, बोटिंगचा आनंद घेतात. अशा वेळी अधिक पुढे जाऊ नका, असे सांगूनही पर्यटक बेपर्वाईमुळे ऐकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असूनही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांच्या अंगाशी येतं. समोर आलेल्या व्हिडीओमध्येही या महिलेला १० सेकंदांत आयुष्यभराची अद्दल घडली आहे. काही सेकंदांतच महिला किनाऱ्यावरून थेट समुद्रात गेली.

ही घटना आंध्र प्रदेशमधली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्र दिसत असून, समुद्रात मोठमोठ्या लाटाही उसळताना दिसत आहेत. यावेळी काही तरुण-तरुणी, महिला समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. यावेळी एक महिलाही तिथे दिसत आहे. सुरुवातीला किनाऱ्यावर असलेली महिला हळूहळू आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र, तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तोच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचून घेऊन जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ताम्हिणी घाटात १ जुलैला नेमकं काय घडलं? पावसाळ्यात कार घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO एकदा पाहा, पुन्हा हिम्मत नाही करणार

तरुणामुळे वाचले महिलेचे प्राण

दरम्यान, किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात येतं. त्या तरुणाचं लक्ष गेल्यामुळेच त्या महिलेचे प्राण वाचले; अन्यथा त्या महिलेनं जीव गमावला असता.

पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं महागात पडू शकते

अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर raaaaaaaaaaaaaaamu नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या व्हिडीओप्रमाणेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियामुळे अनेकदा समोर येतात.

Story img Loader