Ramayan Quiz Marathi: संपूर्ण देशभरात अयोध्येतेतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियावर तर अयोध्येच्या राममंदिराची झलक दाखवणरे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर तयार झालेले राम मंदिर हा भाविकांसाठी अत्यंत भावुक क्षण असणार आहे. असं म्हणतात जेव्हा भक्त आपल्या श्रद्धास्थानाचे विचार अंगीकारतो तेव्हा भक्तीला अर्थ तेव्हा येतो. याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे विचार आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. भारतातील महाग्रंथांमधील एक सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे रामायण. आपण राममंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून रामायणातील काही खास क्षणांना, आठवणींना व शिकवणींना उजाळा देणार आहोत. यासाठीच लोकसत्ता ऑनलाईन घेऊन आलं आहे हे रामायणावर आधारित ‘रामायण विशेष क्विझ’. प्रभू रामाच्या जन्मापासून ते १४ वर्षांच्या वनवासापर्यंत, रावण दहनापासून ते अयोध्येत वापसीपर्यंत घडलेल्या घटनांवर आधारित हे प्रश्न सोडवून प्रभू रामाला आणखी जवळून ओळखूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा