Ramayan Quiz: अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनने रामायणासंदर्भात प्रश्नमंजुषेचं (क्विझ) आयोजन केलं होतं. वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. रामायणावर आधारित १० प्रश्न यात विचारण्यात आले. वाचकांनी आपल्या ज्ञानाचा, माहितीचा प्रत्यय घडवत अचूक उत्तरं दिली. विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन! विजेत्यांना मिंत्रा कूपन बक्षीसाने गौरवण्यात येणार आहे. मिंत्राचे कूपन वापरण्यासंदर्भात सविस्तर मेल विजेत्यांना करण्यात आला आहे.
अमोल, विजय, राजेंद्र, सुमेधा, राहुल यांच्यासह १० जणांना मिंत्रा कूपनने गौरवण्यात येणार आहे. क्विझच्या निमित्ताने भगवान राम आणि त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींचा आढावा घेण्यात आला. अचूक उत्तरांसह वाचकांनी रामायणात पारंगत असल्याचं सिद्ध केलं.
लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी या क्विझला अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. क्विझमधील सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं असंख्य वाचकांनी दिली. कमीत कमी वेळेत उत्तरं देणाऱ्या १० वाचकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यापुढेही आकर्षक बक्षीसांसह सादर होणाऱ्या क्विझला तुमचा असाच प्रतिसाद असेल याची खात्री वाटते.
लोकसत्ता ऑनलाइनने याआधी क्रिकेट वर्ल्डकप, दिवाळी तसंच पाकिस्तान निवडणुकांच्या निमित्ताने आयोजित क्विझलाही वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.