Loksabha Election 2024: काहीच दिवसांत देशभरात लोकसभा निवडणुकांना सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची घोषणा झाल्यापासून ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाला आहे. मतांसाठी आणि निवडूण येण्यासाठी उमेदवार काय करतील अन् काय नाही याचा नेम नाही. प्रचारासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते नवनवीन शक्कल लढवत असतात. अश्वासन देताना आपण पाहिलंच असेल. मात्र एका उमेदवाराने प्रचारादरम्यान चक्क हाती वस्तारा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवारानं आपला प्रचार करताना थेट मतदारांची दाढी करणं सुरू केलंय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेते बाहेर पडतात. पाच वर्षे तोंडही न दाखवणारे नेते निवडणुकीच्या वेळी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना भावनिक साद घालतात. एरवी ज्या नेत्यांना भेटण्यासाठी तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतात, ते स्वत:हून तुमच्या दारात येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका उमेदवारानं मतांसाठी थेट हातात वस्तारा घेतला आहे.
तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये लोकसभेचा अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. .उमेदवार चक्क हात जोडून त्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लिहिपर्यंत या व्हिडिओला ७३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल
या उमेदवाराचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून याआधीही अशाप्रकारच्या अनोख्या प्रचाराची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. काही मनोरंजनात्मक प्रतिक्रिया देत आहेत तर काहीजण अशा उमेदवारांवर टीका करत आहेत.