‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका वडिलांनी सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला चक्क बँडबाजा वाजवत वाजत-गाजत घरी आणलंय. हो. याचा व्हिडीओही सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काहीही झाले तरी शेवटी लेक महत्त्वाची

एखाद्या लग्नात नवरदेव आणि वऱ्हाड नवरीच्या घरी बँडबाजा वाजवत मिरवणूक काढत आणि फटाके वाजवत जातात. पण तुम्ही याआधी कधी हे ऐकले आहे का की, वडिलांनी मुलीला सासरी जाऊन बँडबाजा वाजवत वाजत-गाजत घरी आणलंय. रांचीमधील एका वडिलांनी सासरच्या जाचाला कंटाळलेल्या आपल्या लेकीला अशा पद्धतीनं घरी आणलं. या वडिलांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक होते. बँड वाजत आहे आणि दुसरीकडे लोक फटाके फोडून आनंद साजरा करीत आहेत. स्वतः वडील प्रेम गुप्ता यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

असा बाबा सर्वांना हवा!

हा व्हिडीओ शेअर करीत प्रेम गुप्ता यांनी लिहिलेय, “जर तुम्ही मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करता, तर मग नंतर तिच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टीही सहन न करता, तिला थाटामाटात सन्मानानं घरी परत आणा. मुली या खूप मौल्यवान आहेत.” हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरी प्रेम गुप्तांच्या या कृतीचे कौतुक करीत आहेत. “ही मुलगी खूप भाग्यवान आहे. कारण- तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्या एक युजरनं “असा बाबा सर्वांना हवा”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा >> धक्कादायक! शिक्षिकेनं चिमुरडीला लगावल्या ३५ कानशिलात; सीसीटीव्ही VIDEO त क्रूर वागणूक कैद…

साक्षीच्या निर्णयाला वडिलांची साथ

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी गुप्ता आणि सचिन कुमार यांचा विवाह २८ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. सचिन झारखंड विद्युत विभागात काम करतो. लग्नानंतर काही दिवसांपासून सचिनच्या कुटुंबीयांनी साक्षीचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही, तर काही दिवसांनी त्या मुलाचं दोन वेळा लग्न झाल्याचं कळलं तेव्हा ती अस्वस्थ झाली. साक्षीनं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला; पण शेवटी तिनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या वडिलांनीही तिला साथ दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranchi father arrives with band to bring back his tortured daughter from her in laws video viral srk
Show comments