Rang Panchami Quotes Wishes Status : होळी झाली की सर्वांना वेध लागतात ते रंगपंचमी सणाचे.रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो तो रंगपंचमीचा सण. फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व गोप आणि गोपिकांना एकत्र करून रंगाचा हा सण साजरा करत असे. यंदा रंगपंचमीचा सण हा उदय तिथीनुसार १९ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सण आवडतो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे. मनातील हेवे-दावे बाजूला ठेवून मन मोकळेपणाने रंगपंचमी साजरी केली जाते. पण तुमच्या प्रिय व्यक्तींपासून दूर असाल किंवा तुम्हाला आप्त स्व‍कीयांना व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर रंगपंचमीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना हो सुंदर मेसेज, कोट्स पाठवू शकतात.

रंगपंचमी २०२५ निमित्त तुमच्या प्रिजनांना पाठवा रंगपंचमीच्या शुभेच्छा (Rang Panchami wishes 2025)

हातात रंगानी भरलेली पिचकारी
गालावर चढली लाजेची रंगाची लाली
या रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छा
रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

पाणी वाचवा
नैसर्गिक रंग वापरा
कोणालाही दुखापत न होऊ देता
चला खेळू या रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

रंगपंचमीच्या शुभेच्छा

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
गुलाबी, गुलालाचा
लाल रंग गुलाबाचा
हिरवा रंग पानांचा
पिचकारीत भरून सारे रंग
खेळू या एकमेकांच्या संग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

रंगपंचमीच्या शुभेच्छा

साथ रंगांची, उधळण आनंदाची…
रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा!!

भिजुदेत अंग, गुलाबी रंगाने रंगुदेत अंग
नाचण्यात होऊदेत मन दंग
पिचकारीत भरून सारे रंग
रंगपंचमीला जोडू प्रेमाचा रंग

रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

रंगपंचमीच्या शुभेच्छा

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करूया सण रंगपंचमीचा

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.

रंगपंचमीच्या शुभेच्छा