दिवाळीच्या पाच दिवसांत व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर तुम्हाला छान छान रांगोळीचे फोटो पाहायला मिळाले असतीलच. या सुंदर रांगोळींचे फोटो दिवाळीच्या काळात सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतात, ‘लाफिंग कलर्स’ या फेसबुक पेजवर टाकलेल्या रांगोळीचा एक फोटो असाच व्हायरल होत आहे. एका चिमुकलीने पाने आणि फुलांच्या पाकळ्या वापरून खूपच सुंदर रांगोळी बनवली आहे. चेह-यावर निरागस हास्य ठेवून आपली रांगोळी दाखवणा-या मुलीचा फोटो लोकांना खूपच आवडत आहे. हा फोटो कोणी काढला हे मात्र समजले नसले तरी हा फोटो झारखंडमध्ये राहणा-या एका मुलीचा आहे. झारखंडमधल्या मधूपूर गावात राहणा-या या मुलीचे नाव मुन्नी टुडू असल्याचे समजते आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Story img Loader