‘इक प्यार का नगमा है…’ हे गाणे गाऊन रानू मंडल स्टेशनवरून रातोरात सोशल मीडिया स्टार बनली. मात्र सध्या तिची अवस्था अशी आहे की तिला कोणीही विचारत नाही. रानू मंडल सध्या अज्ञाताचे जीवन जगत आहे. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राणू एका मुलीला झाडूने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून मुलगा आणि मुलगी दोघेही राणू मंडलवरील व्हिडिओच्या संदर्भात काही कामासाठी आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीचा ट्रेनमधला स्कर्ट घालून डान्स केलेला व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. हीच मुलगी राणू मंडलला भेटायला येते तेव्हा काय होते पाहा. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता राणू मंडलला राग येतो आणि नंतर ती दोघांना मारायला सुरुवात होते. हा व्हिडिओ जुना असल्याचं बोललं जात आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshh नावाच्या युजरने शेअर केला आहे, जो आतापर्यंत १ मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. तुम्हीही पहा हा मजेदार व्हायरल व्हिडिओ.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फौजी तिरंग्यासाठी जगतो पण कुटुंब सुटत नाही; जवानानं अचानक बायकोला दिलं सरप्राईज, VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘योग्य उपचार देण्यात आले’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘रानू मंडलची स्थिती काय आहे?’ त्याचवेळी तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘म्हणून आज अशी वेळ आली आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranu mandal video went viral after girl beat her with broom watch viral video on social media srk