Ranu Mondal Viral Video: रस्त्यावर गाणं गाणाऱ्या रानू मंडल सोशल मीडियावर रातोरात प्रकाशझोतात आली होती. आताही मंडलच्या एका व्हिडओची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत रानू मंडल एका तरुणासोबत बाईकवर बसलेली दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोमॅंटिक गाणे लावण्यात आलं असून बाईकवर बसलेला तरुण गाण्याचं लिप्सिंग करताना दिसत आहे. दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने थेट म्हटलंय, अखेर रानू मंडलाल प्रियकर मिळाला? हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रानू मंडलच्या या रोमॅंटिक व्हिडीओला नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव केला जात आहे. काही जण रानूला शुभेच्छा देत आहेत, तर काही जण तिची रोमॅंटिक अदा पाहून खिल्ली उडवत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “जो वर आहे, त्याची भीती वाटली पाहिजे, गरुडा पुराणात अशा लोकांना वेगळी शिक्षा आहे.” तर रानू मंडलची मानस्थिक स्थिती बिघडली आहे का? असा प्रश्न दुसऱ्या नेटकऱ्याने उपस्थित केला. तर अन्य एका युजरने बाईकवर बसलेला मुलगा रानू मंडलचा प्रियकर आहे? असं म्हणत खिल्ली उडवली.

नक्की वाचा – Leopard Attack Video : बिबट्याने इमारतीच्या कुंपणावरून झेप घेतली अन् थेट कारवर केला हल्ला, १३ जण जखमी

इथे पाहा व्हिडीओ

कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर रानू मंडलने ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गायलं होतं. या गाण्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाने एका सिनेमात रानूला गाणं गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर रानूची संपूर्ण बॉलिवूड विश्वात जोरदार चर्चा रंगली होती. हे गाणं गायल्यानंतर रानूचा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय सहभाग दिसला नाही. मात्र, इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओनं पुन्हा एकदा रानूच्या चर्चेला उधाण आलं आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranu mondal romantic love expressions with bike rider netizens funny reaction on ranus instagram viral video nss