आपल्या आवाजामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘मानिके मगे हिते’ गाण्यावर रानू मंडल यांनी गाणं गायल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या एका नव्या गाण्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रानू मंडल सध्या ट्रेंडींगवर असलेलं ‘बसपन का प्यार’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Rondhon Porichoy या युट्यूबरने रानू मंडल यांच्या नव्या गाण्याची १५ सेकंदाची क्लिप पोस्ट केलीय. या गाण्याला आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. लाल रंगाचं टी आणि स्कर्ट परिधान केलेल्या रानू यांनी सहदेव दिरडो आणि बादशाह यांचं ‘बसपन का प्यार’ हे गाणं अतिशय सुंदर पद्धतीने गायलंय.

‘बसपन का प्यार’ हे एक टॉप ट्रेंडिंग गाणं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हे गाणं रिलीज झालं होतं. काही दिवसांपूर्वी सहदेवचं बसपन का प्यार हे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आणि प्रत्येकजण सहदेवचा चाहता झाला. यानंतर, बादशहाने सहदेवला भेटण्यासाठी चंदीगडला बोलावलं आणि त्याच्यासोबत गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणे यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर होतं. हे गाणं आजही लोकांच्या मनात बसलेलं आहे. यात रानू मंडल यांना सुद्धा या गाण्यावर गाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये हे गाणं गायलंय. रानू मंडल यांचा हा नवा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीला पडताना दिसून येतोय.

पुन्हा एकदा रानू मंडल चर्चेत

सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना रानू मंडलचा हा अंदाज खूपच आवडलाय. रानू मंडल यांना आता हवी तितकी लोकप्रियता मिळत नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे. दोन वर्षापूर्वी रानू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा हैं’ हे गाणं गात होत्या. त्यावेळी प्रत्येकजण त्यांचं हे गाणं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करत होता. त्यानंतर त्यांचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि बघता बघता त्या सोशल मीडियावरील स्टार बनल्या. इतकंच नव्हे तर त्यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी देखील मिळाली. पण त्यानंतर काही कारणांमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि त्यांची वाढलेली लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होऊ लागली. रानू मंडल यांच्या या नव्या व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे प्रतिक्रियामध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranu mondal sings bachpan ka pyaar in new viral video internet reacts prp