Ranveer Singh Criticizing PM Narendra Modi: अलीकडेच बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया वेबसाइटवर आला होता ज्यात आमिर १५ लाख रुपये खात्यात आले नसतील तर सरकार बदलण्याची गरज आहे असे बोलताना दिसला होता. याबाबत नंतर आमिर खानने स्पष्टीकरण देत सांगितले होते की त्याने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही. कथित २७-सेकंदाची क्लिप आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान वापरून एडिट आणि तयार करण्यात आली होती. आता या प्रकरणाच्या पाठोपाठ लगेचच अभिनेता रणवीर सिंगचा असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तो मोदींवर टीका करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये आपण ऐकू शकता रणवीर सिंह म्हणतो की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करण्यासाठी आले आहेत, ज्यात बेरोजगारी, महागाई यांचा समावेश आहे, भारताची वाटचाल अन्यायाच्या दिशेने होत आहे. आपण न्याय मागितला पाहिजे. पोस्टच्या शेवटी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा रणवीरने केले आहे. पण याही व्हिडीओमागे एक वेगळीच कहाणी असल्याचे समजतेय, ती नेमकी काय हे पाहूया..

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Sujata Paul ने वायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

ANI च्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शोधून आम्ही आमचा तपास सुरू केला. रणवीर सिंहचा २ मिनिटे ३३ सेकंदांचा व्हिडिओ एएनआयवर अपलोड करण्यात आला होता.

https://x.com/ANI/status/1779512665544462746

यामध्ये तो काशीमधील अनुभवाबाबत बोलताना दिसत आहे. पुढील वेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह काशीला यायला आवडेल असेही तो सांगत होता. पुढे तो म्हणाला की, नरेंद्र मोदींचा उद्देश समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करणे हा आहे. भारत आता आधुनिकतेकडे जात आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी रणवीर सिंह आणि अभिनेत्री क्रिती सॅनन काशीमध्ये होते व याबाबत अन्य बातम्याही आम्हाला आढळून आल्या.

https://m.economictimes.com/magazines/panache/ranveer-singh-kriti-sanon-offers-prayers-at-varanasi-walk-the-ramp-at-namo-ghat/articleshow/109309424.cms
https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/ranveer-singh-kriti-sanon-offer-prayers-at-varanasi-walk-the-ramp-for-manish-malhotra-watch-101713142748247.html
https://theprint.in/feature/pm-modi-has-absolutely-changed-kashi-in-10-years-ranveer-singh/2041043/

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही IIT जोधपूरच्या सहकार्याने विकसित केलेल्या AI डिटेक्शन टूल itisaar.ai मध्ये खोट्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या व्हिडिओमधीलऑडिओ अपलोड केला.

ऑडिओच्या विश्लेषणानंतरच्या अहवालात असे आढळून आले की ऑडिओ बनावट आहे आणि व्हॉईस स्वॅप तंत्राचा वापर करून तयार करण्यात आला आहे.

हे ही वाचा<< “जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?

निष्कर्ष: रणवीर सिंहचा लोकांना न्यायासाठी मत देण्याचे आवाहन करणारा व्हायरल व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एडिट करण्यात आला आहे. मुळात रणवीर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत होता. व्हायरल व्हिडिओ खोटा आहे.