बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला भारतात आला आहे. किली पॉल भारतीय गाण्यांवर लिपसिंक करूनच जगभरात लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारसुद्धा त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. नुकतंच मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये खुद्द रणवीर सिंगने किलीचे स्वागत केले आहे.

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेटा क्रिएटर डे’ या कार्यक्रमात किलीने हजेरी लावली. हा दिवस कंटेन्ट किएटर्स आणि त्यांनी संपूर्ण जगासह शेअर केलेल्या कंटेन्टला समर्पित आहे. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही पोहचला. दरम्यान, किली आणि रणवीरने स्टेजवर एकत्र डान्स केला. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांना हे व्हिडीओ फारच आवडले आहेत.

…अन् सुप्रिया सुळेंना कुंकू लावताना विधवा सुनेला सासऱ्यांनी दिला आधार; अंगावर शहारे आणणारे Photos पाहाच

रणवीर सिंग आणि किली पॉलसह फैजल शेख, जन्नत जुबेर तसेच इतर अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी रणवीरने अतिशय उत्साहात किलीचे स्वागत केले. त्याचबरोबर दोघांनी स्टेजवर एकत्र डान्सही केला. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग आणि किती पॉल स्टेजवर नाचताना दिसत आहेत.

Story img Loader