Ranveer Singh Deepika Padukone Video: रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपटाचे प्रमोशन ज्या दणक्यात सुरु झाले होते यावरून तर हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असे वाटतं होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील तगडी स्टारकास्ट, रणवीरसह दीपिकाचा कॅमिओ या सगळ्याची जादू ‘सर्कस’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये काही दिसून आलेली नाही. चित्रपट काहीसा फेल होताना दिसत असला तरी रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ चित्रपटामधील ‘करंट लगा रे’ गाणं चांगलंच गाजलं आहे. अलीकडे कोणतेही गाणे हिट आहे की नाही याचं प्रमाण मीमर्स मंडळीच देत असतात. ज्या गाण्यावर सर्वाधिक मीम्स बनतील ते गाणं हिट असा काहीसा अलिखित नियम वजा ट्रेंड दिसून येत आहे. करंट लगा रे गाणं सुद्धा या नियमाच्या चौकटीत बसलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंगने पत्नी व अभिनेत्री दीपिका पदुकोणसह खरोखरच विजेसारखा उर्जावान डान्स केला होता. यावर आता एका हुशार पठ्ठ्याने धम्माल एडिटिंग करून कमाल व्हिडीओ बनवला आहे. भरत जाधव यांचं गाजलेलं पात्र गलगले तुम्हाला ठाऊक असेलच. या चित्रपटातील गोरी गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावर रणवीर व दीपिकाचा डान्स सिंक करून या पठ्ठ्याने हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल यात काहीच शंका नाही. स्वतः सिद्धार्थ जाधवने सुद्धा यावर कमेंट करून एकदम कडक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीर सिंग अलीकडेच प्रमोशन निमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा व चला हवा येऊ द्या मध्ये सुद्धा आला होता, यावेळी रणवीरचे मराठी भाषेवरील प्रेम सुद्धा फार प्रकर्षाने दिसून आले. आणि आता गलगलेच्या रूपात सुद्धा रणवीर इतका परफेक्ट नाचताना दिसत आहे की हे गाणं मुळात त्याच्यावरच शूट झालं होतं का असेही एक क्षण भासतं.

रणवीर सिंह बनला गलगले अन् दीपिका गौरी..

@EditwalaDost या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या अकाउंटवर अनेक मराठी हिंदी गाण्यांचे असेच स्पूफ म्हणजेच मजेशीर रिमेक्स पाहायला मिळतात. एका २४ वर्षीय तरुणाने हे अकाउंट बनवलेले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh deepika padukone dance on marathi song of bharat jadhav siddharth jadhav comments video goes viral svs