Melanistic Tiger Found In India Video Viral : वाघाचं दर्शन झालं की अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. कारण वाघाच्या जबड्यात सापडल्यावर मृत्यू अटळच समजायचं. पण घनदाट जंगलात सफारी करताना अचानक दुर्मिळ प्राण्यांचं दर्शन होतं. अशातच वाघासारखा प्राणी समोर असेल तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण ओडीशाच्या सिमलिपाल नॅशनल पार्कमध्ये असाच एक आगळावेगळा दुर्मिळ वाघ दिसला आहे. या वाघाचा रंग आणि आकार पाहून अनेकांना घाम फुटला आहे. कारण याआधी पिवळ्या किंवा तांबड्या रंगाचा वाघ जंगलात फिरताना आपण पाहिला असेल. पण या जंगलात आढळलेला वाघ खतरनाक असून तो विचित्र प्राण्यासारखा असल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओडीशाच्या जंगलात काळ्या रंगाचा दुर्मिळ वाघ फिरत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. या वाघाला (Melanistic Tiger) असं म्हणतात. त्वचेवर गडद काळ्या रंगाच्या छटा आणि अंगावर केसांचं जाळ पसरलेला वाघ जगभरात लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सही चक्रावून गेले आहेत. कारण अशा प्रकारचा वाघाचं क्वचितच कुणाला दर्शन झालं असेल. वाघाचा हा थरारक व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, ओडीशाच्या सिमलिपाल व्याघ्र अभयारण्यात दुर्मिळ वाघाला सुंदर कॅमेराने कैद केलं आहे. काळ्या रंगाचे वाघ पाहण्यासाठी हे एकमेव ठिकाण आहे.

नक्की वाचा – Viral Video: सापाने तरुणीच्या चेहऱ्यावर घेतला चावा! किस करायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं

इथे पाहा खतरनाक वाघाचा व्हिडीओ

भारतील महत्वांच्या अभयारण्यांपैकी सिमलिपाल हे एक आहे. बेंगाल टायगर्सही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगल सफारी करताना वन विभागाचे अधिकारी वाघांच्या जवळ जाऊन जीव धोक्यात टाकू नका, अशा सूचना नेहमी देत असतात. त्यामुळे कोणत्याही अभयारण्यात वाघ पाहण्यसाठी गेले असता लोकांनी सावधानता बाळगावी आणि वन विभागाचे नियम पाळावे, असं आवाहनही केलं जातं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare melanistic tiger captured in camera at odishas national park similipal tiger reserve viral post shocking wildlife videos nss