Rare Melanistic Tiger: सध्या जगात वाघांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. अनेक देशांमध्ये प्रयत्नांना यश देखील आले आहे. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात दुर्मिळ वाघाच्या पिल्लाचं दर्शन झाले आहे. हे पिल्लू आपल्या आईसोबत रात्रीचा जंगलात फिरतानाचा हा व्हिडिओ आहे. IFS अधिकाऱ्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

( हे ही वाचा: VIRAL VIDEO: जंगलाचा राजा सिंहावर हत्तीचा गुपचूप हल्ला, जीव वाचवून पळ काढणार तोच समोर दुसरा हत्ती; यानंतर काय झाले ते तुम्हीच पाहा)

भारतीय वन सेना अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी यात म्हटलंय, तुम्ही काळ्या वाघाच्या पिल्लाची क्लिप याआधी पाहिली नसेल. विपुलता (Abundism) हा रंगद्रव्याचा प्रकार आहे जो वाघाच्या झाकून ठेवलेल्या मोठ्या पट्यांमध्ये ओळखता येतो. त्यामुळे ते मेलेनिस्टिक दिसते. काहीजण याला स्यूडोमेलेनिझम असेही म्हणतात.

काळे वाघ सिमिलीपालमध्ये आढळतात

काळे वाघ अतिशय दुर्मिळ असून ते फक्त सिमिलीपालमध्ये आढळून येतात. मेलेनिस्टिक म्हणजे काळ्या वाघाच्या अंघावरील असलेले पट्टे गडद असल्याचे म्युटेशन आहे. बघायला गेलं तर हे बंगाल टायगर आहेत. पण एका विशिष्ट जनुकांमुळे त्यांच्या अंगावरील पट्यांचा रंग गडद झाला आहे.

Story img Loader