अस्वलाचा खेळ तुम्ही पाहिलाच असेल. पण तुम्ही कधी दोन अस्वल रस्त्याच्या मधोमध भांडताना पाहिले आहेत का? होय, हा एक दुर्मिळ क्षण आहे, जो प्रत्येकाने पाहणे शक्य नाही. पण एका व्यक्तीने हा अद्भुत आणि दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेणेकरून अस्वल किती शक्तिशाली आहेत हे सर्वांना कळेल. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओला जवळपास २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आणि हो, या व्हिडिओमध्ये एक लांडगाही आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला तो देखील सापडेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला दोन अस्वल भांडू लागतात. हळूहळू ते रस्त्याच्या मधोमध पोहोचतात. दोघांची टक्कर इतकी जोरदार असते की ते एकमेकांना ओढत पुढे रस्त्याच्या कडेला येतात. दरम्यान, दूरवर उभा असलेला एक लांडगा त्यांना लढताना दिसत आहे. हे भांडण तेव्हा संपते जेव्हा एक अस्वल दुसऱ्या अस्वलाला पळायला लावते.

( हे ही वाचा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिसल्या चक्क भाजी मंडत; भाजी विकत घेतानाचा Video Viral)

ही लढाई कोण जिंकणार?

( हे ही वाचा: आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली Scorpio- N कार; ट्विटरवर फोटो शेअर करत म्हणाले “चांगले नाव सुचवा…” लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा दुर्मिळ क्षण कॅरी मॅकगिलिव्रेने फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलंय “‘हा एक अद्भुत क्षण आहे, जो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे” जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला लांडगा देखील दिसेल. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला २० लाख व्ह्यूज आले आहेत. तसंच अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.