गेल्या वर्षीच्या लॉकडाउनपासून सोशल मीडियावर काही भयंकर फूड कॉम्बिनेशन व्हायरल होऊ लागले आहेत. गुलाबजाम पाव, कुरकुरे मिल्कशेक, चॉकलेट मॅगी, आइस्क्रीम डोसा, कुल्लड पिझ्झा, चॉकलेट ड्रायफुट डोसा असे भयंकर कॉम्बिनेशन समोर आले होते. जगभरात अनेक लोक असे असतात ज्यांना चविष्ट पदार्थांसोबत अनेक प्रयोग करायला आवडतात. अनेकदा या वेगळ्या प्रयोगांमुळे हा पदार्थ अधिकच चविष्ट बनतो तर अनेकदा हा प्रयोग पूर्णतः फसतो. सध्या या विचित्र फूड कॉम्बिनेशनच्या यादीत आणखी एका नव्या पदार्थावर करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होणारी ही डिश पाहून लोक हैराण झाले आहेत.

‘रसगुल्ला’ म्हटलं की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. असा तोंडाला पाणी सोडणारा रसगुल्ला विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदतीने बनविला जातो. यासाठी प्रत्येक ठिकाणची टेस्ट ही वेगळी ठरते. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे रसगुल्ला देखील अनेक ठिकाणी असतात. पण सध्या व्हायरल होणाऱ्या रसगुल्लाची मात्र गोष्ट काही वेगळीच आहे. या रसगुल्ल्यांना पारंपारिक पद्धतीपेक्षा उलटं बनविण्यात आलं आहे. रसगुल्ल्याला वेगवेगळे फ्लेवर्स देणं इथपर्यंत ठीक होतं. पण मात्र थेट ‘रसगुल्ला चाट’च बाजारात आलाय. होय, तुम्ही बरोबर वाचलं. ही डीश सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

रसगुल्ला ज्याला रोसोगोल्ला असंही म्हटलं जातं. आपल्या देशात रसुगल्ला आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रसगुल्ल्याचं उगमस्थान पश्चिम बंगाल असून सर्वसाधारणपणे रसगुल्ला गोड आणि रसयुक्त पदार्थ आहे. तर दुसरीकडे चाट बटाटे, शेव, दही, चटणी इत्यादी विविध पदार्थांनी बनवलेला एक लोकप्रिय चवदार नाश्ता आहे. गोड रसगुल्ला आणि चटपटीत चाटचं कॉम्बिनेशन करत ‘रसगुल्ला चाट’ ही नवी डीश बनवण्यात आलीय. या विचित्र फूट कॉम्बिनेशनचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रसगुल्ला चाट बनवण्यासाठी एक व्यक्ती रसयुक्त रसगुल्ला पिळून त्यातलं रस काढून घेतो. या रसगुल्ल्यांना मधून कापत दोन भाग केले जातात. त्यावर थोडा चाट मसाला टाकला जातोय. त्यानंतर रसगुल्ल्यांवर चिंचेची गोड चटणी आणि दही लावलं जातं. त्यावर बदाम, काजू आणि मनुके ठेवले जातात. ही डीश सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर आणखी वरून थोटी चिंचेच्या चटणीचा फ्लेवर टाकला जातोय. जगावेळी ही ‘रसगुल्ला चाट’ डीश व्हिडीओमधला व्यक्ती सर्व करतो.

@KaptanHindostan नावाच्या ट्विटर हॅंडलरून या जगावेगळ्या ‘रसगुल्ला चाट’च्या डीशचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विचित्र फूड कॉम्बिनेशनचे पदार्थ पाहून नेटिझन्स वैतागले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा या ‘रसगुल्ला चाट’च्या डीशने नेटिझन्सची झोप उडवली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बरेच लोक या फोटोवर वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक असं म्हणत आहेत की ते चवदार असेल. तर इतर काही म्हणतात की रसगुल्लासोबत हे करू नका, असं मत व्यक्त केलं आहे.

मुख्य म्हणजे ट्विटरवर ही पहिली वेळ नाही जेव्हा एखाद्याने विचित्र कॉम्बिनेशननं पदार्थाचा व्हिडीओ शेअर केला आहे. याआधीही दूधासोबत मॅगी, दाल माखनी कॉफीयांसारखे हटके पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर रसगुल्ला चाटचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर २९९ लोकांनी हा व्हिडीओ रीट्वीट करत नव्या डीशबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचवीत आहेत.

Story img Loader